आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सर्व धरणे ऑगस्टअखेर भरणार, कमी दाबाच्या पट्ट्याने महाराष्ट्र चिंब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाबळेश्वर परिसरातील जोरदार पावसामुळे वेण्णा लेक रस्ता पूर्णपणे जलमय झाला होता.  छाया : संजय दस्तुरे - Divya Marathi
महाबळेश्वर परिसरातील जोरदार पावसामुळे वेण्णा लेक रस्ता पूर्णपणे जलमय झाला होता. छाया : संजय दस्तुरे
औरंगाबाद - तीन वर्षांच्या दुष्काळानंतर राज्यावर यंदा नैऋत्य मान्सूनची आतापर्यंत चांगली कृपा होत आहे. आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी पावसाने राज्याला चिंब केले आहे. राज्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हा पाऊस होत असल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे आणि श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. ऑगस्टअखेर राज्यातील सर्व धरणे भरतील अशी शक्यता डॉ. साबळे यांनी वर्तवली. एल निनो आणि ला निनोच्या चक्रात अडकलेल्या मान्सूनचे वेळापत्रक पहिल्या दोन महिन्यांपुरते तरी सरासरी गाठणारे ठरले आहे. ऑगस्ट महिन्यात सुमारे १०४% पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढे वाचा...
> का पडतोय इतका पाऊस
> किती दिवस राहणार स्थिती
> पावसाचा उपयोग