आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व पीएमसी रद्द! महानगरपालिकेचा खर्च वाचण्याची आशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लाखो,करोडो रुपयांच्या कामांवर देखरेखीसाठी नेमलेल्या पण काडीचे काम करणाऱ्या पीएमसी रद्द करण्याचा निर्णय आज मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला. यामुळे मनपाचा मोठ्या प्रमाणात पैसा वाचणार असून त्यातून विकासकामे करता येणे शक्य होणार आहे.

गेल्या आठवड्यात मनपाचा कार्यभार स्वीकारल्यावर आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासमोर २४ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांसाठी विनानिविदा प्रकल्प सल्लागार संस्था अर्थात पीएमसी नेमण्याचा विषय आला होता. त्यांनी त्याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी किती कामांवर पीएमसी आहेत त्या काय करतात याची माहिती घेतली असता पीएमसीवर विनाकारण मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत असून मनपाकडे तज्ज्ञ अधिकारी अभियंते असताना देखरेखीची कामे त्यांच्याकडूनच करणे सोयीस्कर असल्याचे समोर आले. त्यानंतर आज त्यांनी समांतर भूमिगत गटारसारख्या मोठया याेजना वगळता इतर सगळ्या पीएमसी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पीएमसीचे निकष काय?
एखाद्याप्रकल्पावर अथवा मोठ्या कामावर देखरेख करणे मनपाला शक्य नसेल तर पीएमसी नेमून त्यांच्याकडील तज्ज्ञांच्या माध्यमातून हे काम केले जावे, असा पीएमसीमागचा मूळ शुद्ध हेतू. त्यामुळे पीएमसी निवडताना संबंधित संस्थेची तांत्रिक क्षमता, त्यांच्याकडील मनुष्यबळ हे पाहतानाच त्यांचा मोठी कामे हाताळण्याचा अनुभव हे प्रमुख निकष आहे. कोणतीही पीएमसी नेमताना निविदा मागवून स्पर्धेतून योग्य पीएमसी नेमली जावी हा प्रमुख भाग.

दीडटक्का मोलाचा
पीएमसीलाकामाच्या एकूण किमतीच्या दीड टक्का रक्कम शुल्क म्हणून दिले जाते. या पीएमसी
तुकाेबानगरच्या या रस्त्यावर आता पीएमसीची नजर नसेल.

पीएमसीचे खूळ कधीपासून?
दहा ते बारा वर्षांपासून पीएमसीचे खूळ आले. काही लाखांच्या कामांनाही पीएमसी नेमण्यात आल्या. प्रारंभी त्यांच्याकडून थोडे काम करून घेण्यात आले. नंतर तर हा प्रकार एवढा बोकाळला की चक्क निविदा काढता पीएमसीची परस्पर नेमणूक झाली.

कामाचा दर्जा सुधारेल ?
पीएमसीरद्द केल्याने मनपाचा मूळ कामाशिवाय होणारा मोठा खर्च वाचणार आहे. त्यात इतर अनेक छोटी कामे होऊ शकणार आहेत. मनपाच्या अधिकाऱ्यांना कामांची जबाबदारी घ्यावी लागणार असल्याने दर्जाही सुधारेल, अशी आशा आहे.

काय असते पीएमसीचे काम?
महापालिका जी मोठी कामे हाती घेते त्यासाठी पीएमसी नेमली पाहिजे. पण त्याबाबत नियमांत काहीच तरतूद नाही. पण मोठे काम असेल तर संपूर्ण प्रकल्प आराखडा तयार करणे, त्याला मंजुरी मिळवणे, करारातील अटी शर्तींचे पालन होते की नाही यावर देखरेख करणे, कामांची बिले सगळे तपासून पुढे पाठवणे ही पीएमसीची कामे असतात.