कन्नड - देशात सर्वात अग्रेसर महाराष्ट्र राज्य होते. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमुळे हे राज्य ४५ वर्षे पिछाडीवर गेले आहे, अशी टीका राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी कन्नड येथील सभेत केली.भाजपचे उमेदवार डॉ. संजय गव्हाणे यांच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या. कन्नड, देवगाव रंगारी येथे त्यांच्या सभा झाल्या.या वेळी व्यासपीठावर खासदार भूपेंद्र यादव, राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, संजय खंबायते आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्या म्हणाल्या की, मी महाराष्ट्राची मुलगी असून राजस्थानची सून आहे. येथून गेले त्या वेळचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र खूप बदलला आहे. तो वैभवशाली महाराष्ट्र होता.
आता बकाल झाला आहे. या महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी भाजपच्या सोबत राहा, असे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील परिवर्तन
आपणास घडवायचे असून कन्नड तालुक्यात पर्यटन, कृषी, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांत विकास घडवायचा असल्याने परिवर्तनाचे साक्षीदार व्हा, असेही त्यांनी सांगितले.