आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींची काळजी घेण्यासाठी पोलिसांना मिळणार भत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासह खाण्या-पिण्यावर खर्च करावा लागतो. आजवर पोलिसांनाच ही झळ सहन करावी लागत होती. परंतु आता शासनाच्या तिजोरीतून राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याला दरमहा 11, 250 रुपये दिले जात आहेत. याबाबतचे परिपत्रक 11 सप्टेंबर 2013 रोजी शासनाने जारी केल्याचे सोमवारी पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी सांगितले.
अटकेनंतर आरोपीची पोलिसांना प्रथम शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करावी लागते. कागदपत्रे तयार करणे, झेरॉक्स, जेवण, चहा-पाणी यासाठी खर्च होतो. त्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील पोलिस ठाण्यांसाठी शासनाने आठ कोटी रुपये दिले आहेत. प्रत्येक शहर पोलिस ठाणे, गुन्हे शाखेला दरमहा 11, 250 रुपये, सहायक पोलिस आयुक्तांना 7 हजार रुपये खर्च दिला जात आहे. सप्टेंबर महिन्याचा निधी मिळाला असून आयुक्तालयाच्या तिजोरीत 80 हजार रुपये शिल्लक असल्याचेही आयुक्त म्हणाले.