आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amaraprit Chowk To Mondhe Naka Road Seven Days Off

अमरप्रीत चौक ते मोंढा नाका रस्ता सात दिवस बंद राहणार , अशी असेल वाहतूक व्यवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोंढानाका येथील उड्डाणपुलाचे उर्वरित काम तसेच रोकडिया हनुमान कॉलनी ते मोंढा नाका सर्व्हिस रोडवर जलवाहिनी स्थलांतरासाठी २५ ते ३१ जानेवारीदरम्यान रोकडिया हनुमान कॉलनी ते मोंढा नाका चौक रस्ता बंद करण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप), रेल्वेस्टेशन, गोपाल टीकडून आकाशवाणीकडे जाणारी वाहने क्रांती चौक ते सिल्लेखानामार्गे मोंढा नाका अशी जातील.
क्रांती चौकाकडून आकाशवाणीकडे जाणारी वाहने रोकडा हनुमान कॉलनी चौक, अभिनय सिनेमा, लक्ष्मण चावडी ते मोंढा नाका अशी वळवली जाणार आहेत
बाहेरगावांहून नगर नाक्याकडे येणारी जालन्याकडे जाणारी जड वाहने लोखंडी पूल, पंचवटी, रेल्वेस्टेशनमार्गे बीड बायपासकडे वळवली जाणार आहेत.बाबा पंपाकडून आकाशवाणीकडे जाणारी जड वाहने सेशन कोर्ट ते सावरकर चौक, सिल्लेखाना, मोंढा नाका किंवा अमरप्रीत चौक, काल्डा कॉर्नर, दर्गामार्गे बीड बायपासला जातील.

पाण्याचे वेळापत्रक बदलणार नाही
जलवाहिनीचेस्थलांतर करण्यात येणार असले तरी पाण्याचे वेळापत्रक बदलणार नाही, अशी माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून देण्यात आली आहे. शहरातील सेव्हन हिल्स, सुराणानगर, एमजीएम, कैलासनगर या भागांसाठी ३००, ४०० आणि ७०० मिलिमीटर पाण्याची पाइपलाइन आहे. पाण्याचे वेळापत्रक लक्षात घेऊनच त्या बदलण्यात येतील.