आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक रस्ता अडवून बसवले गेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - अमरप्रीत हॉटेलच्या पूर्व बाजूने बीएसएनएल कार्यालयाकडे रस्ता जातो. हा रस्ता सार्वजनिक रहदारीचा आहे. तरीदेखील वर्षभरापासून तो बंद आहे. याबाबत काही नागरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्या, मात्र लोखंडी गेट काढण्याची धमक महापालिकेने दाखवली नाही. त्यामुळे अखेर या लोकांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली.

वाहतूकवाढल्याने रस्ता बंद : अमरप्रीतचौकातून बंजारा कॉलनीत रस्ता जातो. हाच मुख्य रस्ता आहे. मात्र, बंजारा कॉलनी चौकात रोज वाहतुकीची कोंडी होऊ लागल्याने बंजारा कॉलनी चौकातील दुभाजक पोलिसांनी बंद केले. त्यामुळे अमरप्रीत हॉटेलच्या पूर्वेकडून बीएसएनएलकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली. वाहनांचा त्रास होऊ लागल्यानेच हा रस्ता बंद करण्यात आल्याचे येथील काही लोकांनी सांगितले.

संभाव्यधोके तरी लक्षात घ्यावेत : कॉलनीमध्येएखाद्या ठिकाणी आग लागली तर अग्निशामक दलाची गाडी, अत्यावश्यक वेळी रुग्ण्वाहिका येथे नेण्याची वेळ आल्यास वळसा मारून जाण्याशिवाय पर्याय नाही. किमान संभाव्य धोके लक्षात घेऊन तरी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला पाहिजे.

- येथून जाणाऱ्या वाहनांची गर्दी वाढली होती. त्यामुळे रस्ता बंद करण्याची मागणी कॉलनीतील नागरिक करीत होते. पण, रस्ता नेमका बंद कुणी केला, हे सांगता येणार नाही. एस.एम. देसरडा, अध्यक्ष,श्रीनिकेतन कॉलनी

- अशा पद्धतीने रस्ता बंद करता येत नाही. एखाद्या इमारतीला आग लागली तर अग्निशामक दलाची गाडी लवकर पोहोचू शकत नाही. नागरिकांनी तक्रार केली तर गेट काढून टाकले जाईल. शिवाजीझनझन, प्रमुख,अतिक्रमण पथक
कुणी बंद केला रस्ता?
हा रस्ता बंद कुणी केला, याबाबत कुणालाच माहिती नाही. वाहतूक वाढल्यानंतर अचानक एका रात्रीतून कुणीतरी गेट बसवले अन् रस्ता बंद करून टाकला. आता येथून फक्त पायी जाणे-येणे करता येते. कॉलनीतील काही नागरिकांना जालना रोडला जायचे असल्यास बंजारा कॉलनी चौक किंवा रोकडिया हनुमान कॉलनीकडून वळसा घेत हाच रस्ता कॉलनीवासीयांनी अडवल्याची तक्रार काही लोकांनी केली आहे.
वाहतूक नसल्याने अतिक्रमण
या रस्त्यावर जालना रोडपासून साधारणत: १५० फूट अंतरावर लोखंडी गेट बसवण्यात आले आहे. या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यामुळे अमरप्रीत हॉटेलच्या बाजूला रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. चहाच्या गाड्यासह इतर दुकाने येथे थाटण्यात आली आहे. त्यांचे कामही रस्त्यावरच चालते. हा रस्ता बंदच राहिला तर हे अतिक्रमण पक्के होईल तसेच इतरही लोक अतिक्रमण करतील.