आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारला कर्जमाफी करण्यास भाग पाडू, वाहेगाव येथील धरणे आंदोलनामध्ये अंबादास दानवे यांची ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - गेल्या अनेक वर्षांपासून संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यासाठी कर्जमाफी हा एकमेव उपाय असून कर्जमाफी करण्यास सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी वाहेगाव येथील धरणे आंदोलनादरम्यान दिली.   
 
कर्जमाफीसाठी शिवसेनेतर्फे ग्रामीण भागात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी दानवे बोलत होते. या वेळी कृष्णा पाटील डोणगावकर, रमेश बोरनारे, अंकुश सुंब, पांडुरंग कापे, चंद्रकांत जाधव, सुभाष कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलताना कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दुष्काळासोबतच सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडल्यामुळे शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलत असताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफी केल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे सांगितले. या वेळी बद्री चव्हाण, महेश लिंगायत, बाळासाहेब हिवाळे, शिवाजी कळमकर, चेतन जोशी, प्रवीण वालतुरे, नागेश चौधरी, विठ्ठल पवार, अर्जुन वालतुरे यांच्यासह ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
बातम्या आणखी आहेत...