आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ambedkar Bank Chairman Arrest In Fraud Case Aurangabad

आंबेडकर बँकेच्या संचालकांना अपहार प्रकरणी अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मिलकॉर्नर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेचे संचालक रतन जीवनदास भालेराव (रा. कोतवालपुरा) यांनी चार जणांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून पावणेअकरा लाखांचे कर्ज उचलल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. याबाबत प्रशासक सेवादास राघोबाजी कांबळे यांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून भालेराव यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना शुक्रवार 14 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

ऑक्टोबर 2010 मध्ये डबघाईला आलेल्या बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले. या वेळी कर्ज वाटप करू नये तसेच ठेवीसुद्धा स्वीकारू नये, असे आदेशात म्हटले होते. हा आदेश मिळण्यापूर्वीच भालेराव यांनी चार बनावट व्यक्तींच्या नावे कर्ज उचलले. त्यानंतर पुन्हा मे 2012 मध्ये रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध लादले. बँकेत मोठय़ा प्रमाणावर अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने सेवादास कांबळे यांची ऑक्टोबर 2012 मध्ये प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या चौकशीत भालेराव यांचे पितळ उघडे पडले. शुक्रवारी कांबळे यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात भालेराव यांच्याविरुद्ध तक्रार दिली. उपनिरीक्षक विलास ताटीकोंडलवार यांनी भालेराव यांना अटक केली .

कर्ज वाटपाची प्रक्रिया कशी आहे? तारण म्हणून भालेराव यांनी काय ठेवले होते? कर्जासाठी जामीनदार होते काय?ते कोण आहेत? अशा विविध दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.