आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबासाहेबांच्या कार्याचा प्रसार करू, आज जयंती वर्ष समारोह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पावन पदस्पर्श या शहराला झाला आहे. येथे त्यांनी खूप वेळ घालवला आहे. देशात कोणत्याही ठिकाणी त्यांचा सातबारा नाही, तो औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजच्या जागेचा आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष समारोह औरंगाबाद येथेच करण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतला आहे.
उद्या ( १३ सप्टेंबर) सायंकाळी वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पहिला कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार शरद रणपिसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. मराठवाडाही होरपळला आहे. सध्या काँग्रेसकडून दुष्काळाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातूनच पावले उचलली जात आहेत. डॉ. आंबेडकरांच्या रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष समारोहानिमित्त वर्षभर बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत केलेल्या कार्याचे विचारमंथन, प्रचार प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी लाेकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, काँग्रेसचे अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष के. राजू, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अब्दुल सत्तार, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, काँग्रेसचे अनुसूचित जाती-जमाती भटक्या जमातीचे अध्यक्ष रवींद्र दळवी राहणार आहे, अशी माहितीही रणपिसे यांनी दिली.

पत्रकार परिषदेला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बी.जी. शिंदे, प्रा. प्रकाश सोनवणे, केशवराव औताडे, अॅड. सय्यद अक्रम, माजी आमदार एम.एम. शेख, डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, संतोष भिंगारे, डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे, सुभाष कांबळे, मनोज पाटील यांची उपस्थिती होती.