आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"राकाज'ची हार्ड डिस्क गायब होण्याची चौकशी, मनपा आयुक्तांनी परवानग्यांची कागदपत्रेही मागवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्ड डिस्क गायब असलेले डीव्हीआर. - Divya Marathi
हार्ड डिस्क गायब असलेले डीव्हीआर.
औरंगाबाद - राकालाइफस्टाइलला भेट दिल्यावर महापौर उपमहापौरांनी ताब्यात घेतलेल्या नंतर बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली यांच्याकडे सर्वांसमक्ष सुपूर्द केलेल्या सीसीटीव्ही रेकाॅर्डरमधील हार्ड डिस्क गायब होण्याच्या खळबळजनक प्रकाराची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाची २४ तासांच्या अात तामिली करणाऱ्या मनपाने नंतरच्या आठवड्यात राकावरील कारवाईची प्रक्रिया मंदच ठेवल्याने पुन्हा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेला महिनाभरापासून गाजत असलेल्या राका लाइफस्टाइल प्रकरणात सारे बेकायदेशीर प्रकार समोर येऊनही महापालिका काहीच कारवाई करीत नसल्याने त्या क्लबमधील बेकायदा बांधकामे सुरू असलेले इतर उद्योग उघडकीस आणणाऱ्या महापौर उपमहापौरांची नाचक्कीच झाली आहे. राकाजला सील लावणे, त्यांना न्यायालयात जाता यावे यासाठी पुढील कारवाईला जाणूनबुजून विलंब लावणे आदी प्रकार घडले. याचा फायदा घेत राकानी क्लबच्या आवारात केलेले बेकायदा बांधकाम आपणहून हटवत लाखो रुपयांचे सामानसुमान जप्तीपासून वाचवले. एवढेच नव्हे तर राकाला सील लावताना कायदेशीर अडचण येऊ शकते हे ध्यानात घेऊनही त्यानुसार जाता सील लावण्यात आले. त्यामुळे राका कोर्टात गेले न्यायालयाने मनपाला सील उघडण्याचे आदेश दिले. मात्र कायदेशीर पावले उचलत मनपाने नियमानुसार कारवाई करावी, असे नमूद करण्यात आले असताना प्रत्यक्षात मनपाकडून कासवाच्या गतीने कारवाई केली जात आहे.
महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, अायुक्त प्रकाश महाजन, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांच्या भेटीदरम्यान मसाज पार्लरमध्ये सुरू असलेले ब्यूटी पार्लरमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे उघडकीस आले होते. महापौर उपमहापौरांनी सीसीटीव्ही फुटेजचे रेकाॅर्डरच ताब्यात घेतले सर्वांसमक्ष हा डीव्हीआर बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली यांच्या ताब्यात दिला होता. ज्या दिवशी राका न्यायालयात गेले त्याच दिवशी महापौर उपमहापौरांनी ते रेकाॅर्डिंग तपासण्याचे आदेश दिले असता त्यातील हार्ड डिस्क गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे.

आता मात्र खबरदारी घेतली : महाजन
राकाप्रकरणात मनपाची कारवाई संथगतीने का होत आहे, असे विचारले असता आयुक्त प्रकाश महाजन म्हणाले की, सील लावण्याच्या प्रकारात जसे मनपाला एक पाऊल मागे यावे लागले, तसे होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. राकांना येत्या आठवडाभरात क्लबच्या ज्या ज्या कारणांसाठी परवानग्या घेतल्या आहेत ती कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हार्ड डिस्क गायब होण्याचा प्रकार गंभीर असून त्याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे आयुक्त म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...