आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोटाकारंजा येथील मनपाचा फंक्शन हाॅल परस्पर भाड्याने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या बंदोबस्तात मनपा कर्मचाऱ्यांनी फंक्शन हाॅलची पाहणी केली. छाया : दिव्य मराठी - Divya Marathi
पोलिसांच्या बंदोबस्तात मनपा कर्मचाऱ्यांनी फंक्शन हाॅलची पाहणी केली. छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद - दहा वर्षांपूर्वी मनपाने बांधलेल्या संकुलातील फंक्शन हाॅल चक्क अनधिकृतपणे चालवला जात असून राजकीय व मनपातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तो चक्क परस्पर भाड्याने दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोटाकारंजा भागातील संकुलातील या हाॅलला आज मनपाने सील ठोकले. शिवाय गेल्या दहा वर्षांत संकुलातील गाळेधारकांनीही भाडे भरले नसून पार्किंगच्या जागेत १३ बेकायदा दुकाने रांगेत उभी राहिली आहेत. या सर्वांवर ईदनंतर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील मनपाच्या मालकीच्या मालमत्तांच्या बाबतीत निव्वळ अनागोंदी कारभार सुरू आहे. याबाबत गेल्या तीन वर्षांत सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकांत नगरसेवकांनी वेळोवेळी आवाज उठवला. तत्कालीन उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्याकडे मालमत्ता विभाग असताना शहरातील समाजमंदिरे, सभागृहांना रेडीरेकनरप्रमाणेच भाडे आकारण्याच्या अट्टहासामुळे करोडो रुपयांची मालमत्ता विनावापर पडून असल्याचे उघडकीला आले होते. याशिवाय सभागृहे व समाजमंदिरांत अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचेही अनेकदा समोर आले होते. तत्कालीन नगरसेवक समीर राजूरकर यांनी या मालमत्तांचा वापर होत नसल्याने करोडो रुपयांचा निधी वाया घालवत असल्याचा आरोप करीत उत्पन्नावर पाणी सोडले जात असल्याचा आरोप केला होता. आता खुद्द आयुक्त प्रकाश महाजनांना हा प्रकार पाहायला मिळाल्याने ते थक्क झाले.

काय पाहिले आयुक्तांनी? : शहरातील मनपाच्या मालकीच्या मालमत्तांची काय अवस्था आहे ते पाहू, असे सांगत आयुक्त प्रकाश महाजन यांनी गुरुवारी सायंकाळी उपायुक्त अय्युब खान यांना घेऊन गाडी काढली. लोटाकारंजा भागातील मनपाच्या संकुलावर ते धडकले. तेथील दृश्य पाहून आयुक्त अवाकच झाले. सात गाळे व फंक्शन हाॅल असे मूळ स्वरूप असलेल्या या संकुलात चक्क पार्किंगच्या
नावाची लपवालपवी
मनपाच्या फंक्शन हाॅलवर कब्जा करून तो परस्पर भाड्याने देऊन दहा वर्षे मलई खाणाऱ्याचे नाव काय, असे उपायुक्त अय्युब खान यांना विचारले असता त्यांनी नाव सांगणे टाळले. शिवाय थकलेले भाडे किती हेही आताच सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. याबाबत अधिक माहिती घेतली असता मनपातील वरिष्ठ अधिकारी व राजकारण्यांच्या वरदहस्ताने हा सगळा उपद्व्याप चालला असल्याचे समोर आले. मालमत्ता विभागात या पाॅवरफुल स्वयंघोषित मालकाचे नाव विचारले असता त्यांनीही कानावर हात ठेवले.

आयुक्त म्हणतात, पथक नेमणार
मनपाच्या मालमत्तांची अशी अवस्था पाहून थक्क झालेल्या आयुक्तांनी आता शहरातील सगळ्याच मालमत्तांची पाहणी करून अहवाल मागवला आहे. लोटाकारंजातील संकुलाचे सगळे नकाशे, करारनामे यांचीही माहिती त्यांनी मागवली आहे.
बातम्या आणखी आहेत...