आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Citizens Came India For Spreading Gandhi's Thought

गांधी विचारांच्या प्रसारासाठी अमेरिकेचे ‘गांधी’ भारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महात्मा गांधींना आजच्या पिढीने पाहिले ते फोटोत आणि चित्रपटांमध्ये. मात्र अगदी हुबेहूब दिसणारे ‘अमेरिकेतील महात्मा गांधी’ म्हणून ओळख असणारे बर्नी मायर सध्या भारतात आले आहेत. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आयोजित वीकेंड आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. या वेळी व्हिएतनाम युद्धातील हानी पाहून अहिंसेच्या विचारांनी प्रेरित झालेले लॅरी क्रिचेनर यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती.


बर्नी मायर : यांनी 1959 ते 1969 पर्यंत व्हिएतनाम युद्धाच्या वेळी त्या विरोधात आंदोलन केले होते. या युद्धात वापरली जाणारी शस्त्रे बनवणार्‍या डाऊ केमिकलच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केले. 1961 मध्ये त्यांना तुरुंगवास झाला. तीन महिन्यांनी झालेल्या सुटकेनंतर तीन वर्षे सरकारने त्यांच्यावर नजर ठेवली. मात्र त्यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा चालूच ठेवला. मी कॅथलिक ख्रिश्चन आहे. येशूचे विचार कृतीत उतरवण्यासाठी गांधी विचारांची गरज होती, असे मायर यांनी या वेळी सांगितले. गांधी विचार आजच्या जगातल्या युद्धजन्य परिस्थितीतही महत्त्वाचा असल्याचे मत मायर यांनी व्यक्त केले. ते 2002 पासून गांधींच्या वेशभूषेत जगभर अहिंसेचा प्रचार करत आहेत.