आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पीके\'ची आमिरी, औरंगाबाद शहरात चक्क 490 रुपयांना तिकीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आमिर खानचा बहुचर्चित 'पीके' चित्रपट शुक्रवारी देशभरातील ४२०० स्क्रीन्समध्ये प्रदर्शित झाला. औरंगाबादेतील मल्टिप्लेक्समध्ये तब्बल ४९० रुपयांपर्यंत तिकीटदर होते. 'पीके'चे शहरात पहिल्या दिवशी ८० शो झाले, ते सर्व हाऊसफुल होते. इंटरनेट, फोनवरून सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्येही दोन दिवस आधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होती.

'पीके' ३०० कोटींचा व्यवसाय करणारा पहिला चित्रपट ठरू शकतो, या अटीवर प्रदर्शनाआधीच त्याचे सॅटेलाइट हक्क ८५ कोटींना विकले गेले. त्याशिवाय संगीत हक्काचे १५ कोटी, अशी एकूण १०० कोटींची कमाई त्याने केली आहे. पहिल्याच दिवशी 'पीके'ची कमाई १०० कोटींवर पोहोचू शकते, असा अंदाज आहे.