आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोजके पदाधिकारी नगरसेवकांना लाभला अमित शहा यांचा सहवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा प्रथमच औरंगाबाद मुक्कामी आले. अनेकांना त्यांच्या भेटीची अोढ लागली होती; परंतु पक्षाचे मोजके पदाधिकारी, पालिकेतील नगरसेवकवगळता ते कोणालाही भेटले नाहीत. सुभेदारी विश्रामगृहावर ते थांबणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शिवाजीनगर निवासस्थानी भोजन घेतले, तेथेच आराम केला. काही कार्यकर्त्यांनी त्यांची सुभेदारीवर प्रतीक्षा केली.
परभणी येथे जाण्यासाठी शहा औरंगाबादमार्गे आले होते. रात्री त्यांनी शहरात मुक्काम केला. ते सुभेदारी विश्रामगृहावर थांबतील असे अधिकृतपणे सांगण्यात आले होते. रात्री वाजता येणारे त्यांचे विमान ५० मिनिटे उशिरा उतरले. वाजता विमानतळाहून शहा थेट दानवे यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे मोजके पदाधिकारी, काही आमदार, पालिकेतील नगरसेवक ठरवून निमंत्रित केले. अतिथींसमवेत त्यांनी भोजन घेतले आणि तेथेच मुक्काम केला. सकाळी ते परभणीला जाणार आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, मावळते जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, उपमहापौर प्रमोद राठोड, माजी आमदार गोविंद केंद्रे, ज्ञानोबा मुंडे, माजी आमदार श्रीकांत जोशी, विवेक देशपांडे, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांच्यासह पालिकेतील नगरसेवक पक्षाचे शहरातील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

बागडेंनी थांबवला दौरा : विधानसभेचेअध्यक्ष हरिभाऊ बागडे हे नियोजित दौऱ्यानुसार सायंकाळी रेल्वेने मुंबईला रवाना होणार होते. परंतु त्यांनी त्यांचा दौरा रद्द करून शहरातच थांबण्याचे ठरवले.