आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AMrut Hasya Yog Laughing Therapy Center Aurangabad

एका हास्यतुषाराने व्याधिग्रस्त जीवनातही आनंदाची बहार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाठीची दुखणी, थायरॉइडसह अनेक आजारांमुळे मी जीवनाला कंटाळले होते. त्यातच नऊ वर्षांपूर्वी दुचाकीवरून पडल्याने पाठीचे मणके मोडले. आता व्याधिग्रस्त जीवन जगणेच नको, असे ठरवत मी विद्यापीठातील बुद्धलेणी डोंगरावर आत्महत्येसाठी चढले. पण तो प्रयत्न फसला. मग तापडिया जॉगिंग पार्कच्या झाडावर फाशी घ्यावी म्हणून तयारीनिशी आले. तेथे हास्यतुषार सुरू होता. मला वाटले ही मंडळी माझ्यावरच हसत आहेत. मी थोडे रागारागानेच त्यांच्याकडे आले. पाहिले तर चैतन्य हास्य संघाचा हास्ययोग वर्ग सुरू होता. त्यांनी मलाही सामील करून घेतले. त्या क्षणापासून माझे आयुष्य बदलले, असा रोमांचित करणारा अनुभव देवानगरीत राहणार्‍या ५५ वर्षांच्या माॅन्टेसरी बालक मंदिराच्या शिक्षिका विमल पंडित यांनी कथन केला.

हास्य म्हणजे मनुष्याला मिळालेले सर्वात मोठे वरदान मानले जाते. आजकालच्या तणावपूर्ण जीवनात त्याचा सर्वांना विसर पडला आहे. त्यामुळेच अनेकजण व्याधींनी ग्रासले आहेत. हास्य केवळ चारक्षणांची मौज नव्हे तर जीवन आनंदी करण्याचा मार्ग आहे. याची प्रचितीच त्यांना वर्णन केली. शहानूरमियाँ दर्गा येथील तापडिया जॉगिंग पार्कवर चैतन्य हास्य क्लब आणि अमृत हास्य क्लबतर्फे जागतिक हास्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पंडित यांच्याप्रमाणेच पाटबंधारे विभागातील निवृत्त अभियंते वसंत साटोटे (वय ६५) यांनीही हास्य महिमा सांगितला. ते म्हणाले की, किंचित हसण्यानेही माझ्या गळ्यातील थायरॉइडवर सरकायचा. मग त्याला हाताने दाबून खाली घ्यावे लागायचे. काहीवेळा औषधी घ्यावी लागायची. पण हास्ययोगाने मी तंदुरुस्त झालो आहे. चैतन्य हास्ययोगाचे सदस्य नऊ, तर अमृत हास्ययोगाचे सदस्य वर्षांपासून तापडिया पार्कवर हास्ययोग करतात. सुमारे ७५ सदस्य असलेले एक हास्य कुटुंबच तेथे असते. आज झालेल्या कार्यक्रमास घाटीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजय मगर, अॅड. अंजली कुलकर्णी, डॉ. खुशाल मंुडे प्रमुख पाहुणे होते.

काटे यांनी सांिगतले हास्याचे फायदे
मधुमेह,रक्तदाब नियंत्रण.
पोटाचे विकार बरे होतात.
दिवसभर उत्साह टिकून राहतो.
जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.
श्वसनसंस्था, मज्जासंस्थेची क्षमता वाढते.
शांत झोप येते.

मोबाइलपासून रावणापर्यंतचे हास्य
स्वागत, आकाश, मूक, नमस्कार, मोबाइल, पक्षी, नृत्य, माकड, श्वान, नंदीबैल, हनुमान, रावण, टाळी नाद, सिंह, वाद-संवाद, पिचकारी, गजल, जिलेबी, मिल्क शेक, पंक्चर, आरसा, वेट लिफ्टिंग, टाइम, पतंग अशा २४ प्रकारच्या हास्याचे प्रयोग दररोज क्लबमध्ये केले जातात.

एमआयएम-शिवसेना एकत्र येतात तेव्हा
एमआयएम आणि शिवसेना, भाजपचे आजी-माजी नगरसेवक एका व्यासपीठावर आणि तेही खळखळून हसताना, शक्यच नाही. असे कुणीही म्हणेल. पण रविवारी (तीन मे) सकाळी सात वाजता एन-८ येथील नेहरू उद्यानात हे दृश्य अनेकांना पाहण्यास मिळाले. निमित्त होते हास्ययोग मित्रमंडळातर्फे जागतिक हास्य दिनाचे. शिवसेनेचे नगरसेवक मकरंद कुलकर्णी,ज्योती पिंजरकर, एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी, भाजपचे शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, शोभा वळसे, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, हुशारसिंग चव्हाण यांची उपस्थिती होती. हास्य योग संघाचे अध्यक्ष डॉ. अरविंद गुजराती अध्यक्षस्थानी होते.

ज्येष्ठांना भावनिक आधाराची गरज
औषधांचावाचवा पैसा, नको औषध नको गोळ्या, हसत हसत वाजवा टाळ्या, या ओळींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यात नगरसेवकही उत्साहाने सहभागी झाले होते. हास्याचे फवारे उडवत गेल्या १२ वर्षांपासून नागरिकांचे आरोग्य समृद्ध करत आहे. सेवानिवृत्तीनंतर निर्माण झालेल्या पोकळीत नकारात्मक विचार असतात. अशा वेळी ज्येष्ठांना भावनिक आधार, आनंदी विचारांची आवश्यकता असते. ती हास्ययोगातून मिळते असे डॉ. गुजराती म्हणाले.

आरोग्य जागरूकतेतून हास्ययोगाला प्रारंभ
आरोग्य,हास्याबद्दल उत्सुकतेपोटी मी इंटरनेटवरून हास्य योगाविषयीची माहिती संकलित केली. नंतर हास्याचे ३० प्रकार आत्मसात केले. पहिल्यांदा एकट्यानेच प्रयोग केले. जॉगिंगसाठी येणारे दीपक जाधव सोबत आले. अन् आज क्लबचे स्वरूप आले आहे. - डी.एस. काटे, बीएसएनएल ठेकेदार, अमृत हास्य योग, संस्थापक