आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र यांना टेन्शन आले की मी धीर देण्याचे काम करते!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माझा नवरा मुख्यमंत्री आहे याचा मला सार्थ अभिमान तर आहेच. त्यांना टेन्शन आले की मी धीर देते; पण त्यांच्या राजकारणात माझी ढवळाढवळ कधीच नसते. मुख्यमंत्र्यांची पत्नी, बँकेची सहउपाध्यक्ष आणि आई अशा महत्त्वाच्या भूमिका केवळ संगीतातून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे पार पाडू शकते, अशी गुपिते अमृता फडणवीस यांनी प्रकट मुलाखतीतून उलगडली.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या इंडियन वुमेन नेटवर्क (आयडब्ल्यूएन) या औरंगाबादेतील महिला शाखेचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी हॉटेल ताज येथे झाले. या वेळी आयडब्ल्यूएनच्या राज्य अध्यक्षा कश्मिरा मेवावाला यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
देवेंद्रयांना सल्ला दिला अन् ते मुख्यमंत्री झाले : देवेंद्रयांना जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर आली तेव्हा ते संंभ्रमात पडले होते. तेव्हा मीच तो निर्णय घ्यायला मदत केली. पुढे ते लवकरच मुख्यमंत्रीही झाले, असा किस्साही अमृता यांनी सांगितला. तब्बल पाऊण तास ही मुलाखत रंगली. एका महिला सदस्याने गाण्याची फर्माईश केली. त्यावर अमृता म्हणाल्या, कोणते गाणे आवडेल, शास्त्रीय की सिनेमाचे? त्यावर गर्दी म्हणाली सिनेमाचे...त्यावर अमृता यांनी “हर घडी बदल रही है ये जिंदगी’ या गाण्याचे कडवे म्हणत टाळ्या घेतल्या.
अमृता आणि कश्मिरा यांच्यातील प्रश्नोत्तरे
मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रकट मुलाखतीत उलगडली अनेक गुपिते, सिनेमातील गीतही गायले
प्रश्न : आयुष्यात गुरू म्हणून पहिले स्थान कोणाला देता?
{माझी आई ही पहिली गुरू आहे. नंतर पती देवेंद्र यांना मी मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात मोठे आदर्श आहेत.

प्रश्न: मुख्यमंत्र्यांची पत्नी, बँकेच्या पदाधिकारी,आई ही कसरत कशी सांभाळता?
{अगदी सोपे आहे. मला टेन्शन येत नाही. कारण शास्त्रीय संगीत हे मेडिटेशनच आहे. एक जरी चांगला आलाप घेतला की टेन्शन पळून जाते. मी रोज थोडा वेळ संगीताला देते. त्यातूनच मला ऊर्जा मिळते.

प्रश्न: मुख्यमंत्री देवेंद्र यांना ताण आल्यावर काय करता?
{मी शांतपणे त्यांना धीर देण्याचे काम करते. त्यांच्या राजकारणात माझी ढवळाढवळ कधीच नसते.

प्रश्न: आई-वडील डॉक्टर असताना तुम्ही बँकर कशा झालात?
{मला ऑपरेशन शब्द आजही नकोसा वाटतो. लॅप्रोस्कोपी, सीझर हे शब्द ऐकले की अंगावर काटाच येतो. लहानपणापासूनच अर्थशास्त्र अन् संगीत आवडायचे. त्यामुळे त्यातच करिअर करायचे ठरवले.

प्रश्न: व्यापातही स्वत:ला आनंदी कशा ठेवता?
{उत्साह हाच आनंदाचा झरा आहे. तो मी कायम स्वत:जवळ बाळगते. संगीतातून तो मी सकाळीच मिळवते.

प्रश्न: तुमच्या मुलीवर कसे संस्कार करता?
{आनंदी, उत्साही राहा, मोठ्यांचा आदर कर, असे सतत सांगते.

प्रश्न : महिलांना काय संदेश द्याल?
{ महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त क्षमता आहेत. त्या लग्न झाल्यावर सासरी गेल्यावर आणि गर्भारपणात मागे पडतात. कारण तेथे अनेक महिला चांगले करिअर सोडतात. हाच काळ सांभाळावा. महिलांनी महिलांची मदत करावी. आगामी काळ महिलांचाच आहे.
बातम्या आणखी आहेत...