आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलवाल्याचे दुकान आणि अत्तरगल्ली भावली - अमृता सुभाष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील सिटी चौकातील फुलवाल्याच्या दुकानात आणि अत्तरगल्लीतील चित्रकरणाचा अनुभव आता पर्यंतच्या अनुभवापेक्षा अत्यंत सुखद व वेगळा होता, असे अमृता सुभाष हिने चित्रपटाच्या शूटिंग निमित्त शहरात आली असताना ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अमृता म्हणाली, माझे वय फार नाही; मात्र मला नेहमीच अनेक दिग्गज कलावंतासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये बरेच काही शिकण्यासारखे आहे, माझ्या आयुष्यावर अनेकांची छाप आहे. अभिनयात मेहनतीचे जितके महत्त्व आहे, तितकेच नशिबाचा भागदेखील महत्त्वाचा आहे.
श्हरातील चित्रीकरणाबाबत बोलताना तिने सांगितले की, सिटीचौकातील फुलवाल्याच्या दुकानात आणि अत्तरगल्लीतील अत्तराच्या दुकानात शूटिंगचा अनुभव हा आजवरच्या अनुभवापेक्षा खूप वेगळा होता. माझ्या अभिनयाची सुरुवात ही रंगमंचापासून झाली आहे. त्यानंतर पाऊलखुणा, श्री, भवर, झोका, कथा तसेच अवघाची हा संसार, अशा विविध मालिकांमध्ये मी काम केले.
चकोरी, श्वास, कवडसे अशा चित्रपटांतूनही मी अभिनय केला. प्रत्येक अनुभव वेगळा असतो, त्यातून नवा धडा शिकला जातो. जीवनात विविध अनुभव घेण्याची संधी मिळत आहे, यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. रंगमंचावर पे्रक्षकांचे प्रेम लगेचच कळते, तर मालिकांमुळे आम्ही सर्वांच्याच मनात पोहोचतो. मला माझ्या मालिकांनी मराठी प्रेक्षकांपर्यंत घराघरांत पोहोचवले आहे.
सारेगमची संधी खूप मोलाची - मी रीतसर गाणे शिकले आहे, सुरुवातीला मालती पांडे, समीर दुबळे, वर्षा भावे यांच्याकडून मी शिकले. सध्या विकास भाटवडे यांच्याकडून मी शिकत आहे. सारेगममध्ये मी गाणे गायले आहे.‘लग जा गले के फिर हसी मुलाकात हो न हो’ हे गाणे सुरुवातीला मी गायले आहे, हे गाणे दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी यांना मी अर्पण केले आहे.
अभिमानची जया भादुरी साकारण्याची इच्छा - प्रत्येक कलावंताच्या मनात एक अशी भूमिका असते जी साकारण्याची प्रबळ इच्छा त्याच्या मनात असते. ती पूर्ण होईल न होईल हा दैवाचा, नशिबाचा भाग आहे. याचप्रमाणे अभिमान चित्रपटातील जया भादुरी यांची भूमिका साकारण्याची जबरदस्त इच्छा माझ्या मनात आहे.
* वळूमध्ये असलेल्या भूमिकेपेक्षा विहीरमधील भूमिका वेगळी होती, त्याहीपेक्षा वेगळी भूमिका मसालामध्ये मी साकारत आहे. नव-याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी स्त्री यामध्ये मी साकारली आहे. - अमृता सुभाष