आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amst Habib Speak About On Darpan Day At Aurangabad

स्पॉट रिपोर्टिंग हीच पत्रकारिता - पत्रकार अमर हबीब यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणले आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवत न्याय मिळवून दिला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा आजच्या समाजापुढील गंभीर प्रश्न आहे. मोठमोठ्या दैनिकांत याविषयी अग्रलेख लिहून येतात, वाचक हे वाचून परिस्थितीचा अंदाज घेतात.

पत्रकारिता कार्यालयात बसून करण्याची नसून स्पॉट रिर्पोटिंग करावी, असे मत पत्रकार अमर हबीब यांनी दिला. महात्मा गांधी मिशन संचालित वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यमाने दर्पण दिनानिमित्त मंगळवारी (६ जानेवारी) एमजीएममध्ये परिसंवाद आयोजित केला. "प्रसारमाध्यमे आणि ग्रामीण वास्तव' या विषयावर हबीब बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार हबीब म्हणाले, शेतकरी म्हणजे कोण हे समजावून घ्यायला हवे. ज्याच्या नावावर सातबारा असतो, तो शेतकरी नव्हे. ज्याच्या घराची चूल शेतीवर पेटते, तो शेतकरी आहे. फक्त समस्या मांडून थांबण्यापेक्षा त्या सोडवण्यासाठी पर्याय सांगणारा पत्रकार आहे. काळ वेगवान होतो आहे, पत्रकारांनी अधिकाधिक संवेदशील होऊन घटनांकडे पहायला हवे.

ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी विचारमंचावर आयबीएन लोकमतचे वृत्तसंपादक राजेंद्र हुंजे आणि लोकसत्ताचे अशोक तुपे, प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर, प्राचार्य प्रतापराव बोराडे, प्राचार्या रेखा शेळके आणि प्रा. डॉ. सुरेश पुरी यांची उपस्थिती होती. या प्रसंगी एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या "एमजीएम संवाद', तर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या "वृत्तसाधना' या अंकांचे प्रकाशन करण्यात आले. हुंजे यांनी ग्रामीण वास्तव समजण्यासाठी पत्रकारांनी काय करायला हवे आणि आज प्रसारमाध्यमांची भूमिका काय आहे, हे आपल्या अनुभव आणि उदाहरणातून सांगितले. या वेळी प्रा. डॉ. दिनकर माने, रवींद्र तहकीक, प्रा. आशा माने यांची उपस्थिती होती.