आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत अम्युझमेंट पार्क होणार, रामदास कदम यांचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी शहराच्या परिसरात 'एस्सेल वर्ल्ड'च्या धर्तीवर अम्युझमेंट पार्क उभारणी केली जाणार आहे. मिटमिटा परिसरात २०० एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, ‘औरंगाबादेत पर्यटनाला चालना मिळावी यासाठी २०० एकर जागेवर पर्यटन नगरी उभारण्याचा प्रस्ताव आहे. तेथे एस्सेल वर्ल्डसारखा प्रयोग होऊ शकतो. यासाठी मुंबईतील एक मोठा उद्योजक समोर आला आहे. परंतु कोणी एक जण आला म्हणून आपण त्याला लगेच जागा देणार नाही. त्यासाठी रीतसर निविदा काढून देशभरातील मोठ्या उद्योजकांना आमंत्रित केले जाईल. हा प्रकल्प भव्य कसा होईल, याची काळजी घेतली जाईल, जेणेकरून देशभरातून पर्यटक येथे येतील.’ एप्रिल महिन्यात याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असून निविदा प्रक्रियेनंतर लवकरच काम सुरू होऊ शकते.