आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anand Ingle Visit To Aurangabad Cause A Fair Deal Marathi Play

प्रेक्षकांना समोर ठेवून व्हावी निर्मिती, अभिनेते आनंद इंगळे यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठी चित्रपट चालत नाहीत याचे खापर कलावंत, निर्माते प्रेक्षकांवर फोडून मोकळे होतात. मात्र, माझा विचार काही निराळा आहे. मराठी चित्रपटांना व्यावसायिक यश मिळण्यासाठी निर्मात्यांची जबाबदारीही मोठी आहे. कुणीही खराब चित्रपट करूया असे म्हणत नसला तरीही प्रेक्षकांना समोर ठेवून कलाकृतीची बांधणी व्हायला हवी. गुणवत्तापूर्ण उत्पादन आपण देतोय की अनुदानासाठी ढीगभर चित्रपट करतोय, याचा विचार व्हायला हवा. कदाचित सुमार चित्रपट निर्मिती केल्यामुळेही प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळत नसावेत. त्याचा फटका चांगल्या चित्रपटांनाही बसतो, असे मत हम्मा या मराठी मालिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते आनंद इंगळे यांनी व्यक्त केले.
"अ फेअर डील' नाटकाच्या निमित्ताने ते शहरात आले होते. या वेळी त्यांनी "दिव्य मराठी' प्रतिनिधीला दिलेल्या खास मुलाखतीत रंगमंच, मराठी चित्रपट आणि प्रेक्षक याबद्दलच्या विषयांना हात घातला. आंधळी कोशिंबीर, बाळकडूसारखे चित्रपट तसेच अनेक मराठी मालिकंातून हास्यतुषार उडवून देणारे आनंद विविध विषयांवर दिलखुलासपणे व्यक्त झाले.
आनंद म्हणाले, गेल्या आठवड्यात पाच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले, ही कलावंत म्हणून नक्कीच अभिमानाची बाब आहे, मात्र भीतीसुद्धा वाटते. भीती यासाठी की, या सर्व चित्रपटांनी गल्ला जमवला आहे का? कारण मनोरंजनासोबतच गल्ला जमवणेही महत्त्वाचे आहे. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले असले तरीही प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत पोहोचण्याचे प्रमाण तितकेसे समाधानकारक नाही.
आनंद हणाले, विवेक बेळे यांच्यासोबत माझे हे चौथे नाटक आहे. या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. लेखक म्हणून विविध विषयांना अलगद हात घालत प्रेक्षकांना त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचवण्याचे अफाट कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. मला अनेकदा प्रेक्षकांनी विनोदी भूमिकांतूनच पाहिले आहे, मात्र मी या नाटकात गंभीर व्यक्तिरेखा साकारतोय. नाटकाला मुंबई-पुण्यात उदंड प्रतिसाद मिळाला.
रंगमंच अधिक भावतो
रंगमंचाशी माझी नाळ घट्ट असल्याने नाटकात मी अधिक रमतो. कलावंत म्हणून नाटकातून जो आनंद मला मिळतो तो छोट्या पडद्यावर व्यक्त करता येतो. मराठीत मालिका आणि चित्रपटांतून काम केल्यानंतर हिंदीतून विचारणा झाली खरी पण कधी माझ्या अडचणी तर कधी त्यांच्या, त्यामुळे हिंदी मालिकांत मी प्रेक्षकांना दिसलो नाही. हिंदीतील विनोदी मालिकाही चांगल्या यश मिळवत आहेत, मात्र मराठीसोबतच मला रंगमचं अधिक भावतो. हातखंडा नसलेल्या बाबी करणे मला अधिक खुणावते, असेही त्यांनी सांगितले.