आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत सेलचा स्टील डेपो, गिते मराठवाड्यासाठी वापरणार अधिकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादमध्ये सेल (स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया) च्या माध्यमातून स्टील डेपो उभारला जाईल. उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांमार्फत खरेदीसाठीही औरंगाबादला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी दिले.
वाळूजमध्ये आयोजित मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, महापौर त्रंबक तुपे, ऑटो क्लस्टरचे अध्यक्ष राम भोगले, सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुनीश शर्मा, मसिआचे अध्यक्ष बालाजी शिंदे उपस्थित होते. गिते म्हणाले, माझ्या खात्यांतर्गत ३२ अवजड उद्योग, लोकउद्यमच्या माध्यमातून २९० उद्योग, ७ महारत्न कंपन्या, ८० नवरत्न कंपन्यांसह सेलचा कारभार येतो. त्यामुळे भेल असो अथवा इतर सरकारी कंपन्यांसाठी औरंगाबादच्या उद्योजकांकडून खरेदीसाठी नक्कीच विचार केला जाईल. मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी माझ्या अधिकाराचा वापर केल्याशवाय राहणार नाही. स्टील डेपोची मागणी येत्या अधिवेशनात स्टील मंत्रालयासोबत बैठक घेऊन पूर्ण करू. हिंगोलीमध्ये भेलच्या माध्यमातून फॅब्रिकेशनचा प्रश्न सोडवला जाईल. सूत्रसंचालन विजय लेकुरवाळे यांनी तर शर्मा यांनी आभार मानले.

स्टील डेपोचा फायदा?
औरंगाबादच्या उद्योगासाठी महिन्याकाठी ३० हजार टन स्टीलची आवश्यकता लागते. मात्र सध्या नागपूर, वाशी आणि कळंबोलीवरून हे स्टील आणावे लागते. त्यामुळे जास्तीचा खर्च लागतो. स्टील डेपो झाल्यास उद्योजकांना सरकारी भावात आणि कमी दरात स्टील मिळेल. त्यामुळे त्याचा फायदा उद्योजकांना होईल, असे उद्योजक राम भोगले यांनी सांगितले.