आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघाला परवानगी, मग आम्हाला का नाही- असदुद्दीन ओवेसींचा खुलताबादेत सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद/ औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष आंध्र प्रदेशातील खासदार असदुद्दीन ओवेसी आज (बुधवारी) खुलताबादेत दाखल झाले आहेत. सकाळी 9 च्या सुमारास ते खुलताबादमध्ये आले आहेत. ओवेसी यांच्या जाहीर कार्यक्रमाला औरंगाबाद पोलिसांनी बंदी घातली होती. त्यानंतर औरंगाबादच्या जावेद कुरेशी यांनी ओवेसी यांच्या कार्नर मिटींगसाठी परवानगी द्यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर ओवेसींचा खुलताबाद दौरा वादग्रस्त मानला जात आहे.

माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असे सांगत, ओवेसी यांनी मला जास्त दिवस गप्प बसवता येणार नाही असे म्हटले आहे. औरंगाबादमधील माझ्या सभेला परवानगी नाकारली असली तरी पुढच्या काही दिवसात सभा घेणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाहीर कार्यक्रमाची परवानगी मिळते, मग मला का नाही? असा सवालही त्यांनी येथे उपस्थित केला.
अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावरील आरोपांबद्दल असदुद्दीन म्हणाले, त्यांच्यावर जो आरोप आहे त्याचा निर्णय न्यायालय घेईल. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे प्रकरण न्यायालयात आहे. ते खरच काही बोलले किंवा नाही याबद्दल न्यायालय निर्णय घेईल.

खुलताबाद येथील दर्ग्यात त्यांनी धार्मिक विधी पारपाडले. औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. येथील विश्रामगृहात त्यांच्या राहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संभाजी डौले यांनीही दौ-याला पुष्टी दिली. या दौ-याच्या पार्श्वभूमीवर खुलताबादेत विश्रामगृहाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठाने बंदीवरील तात्पूरती स्थगिती नाकारल्यानंतर आता नांदेडहून औरंगाबाद आयुक्तालयाच्या हद्दीबाहेरून ओवेसी खुलताबादेत आले आहेत.