आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त पालकांनी एकनाथनगर महापालिका शाळा पाडली बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकनाथनगर येथील मनपा शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेचे शनविारी तीव्र पडसाद उमटले. संतप्त पालकांनी बलात्कारी मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत शाळेवर दगडफेक केली. दोषीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत शाळा चालू देणार नाही, असा पवित्रा घेत शाळा बंद पाडली. अखेर पोलिसांनी संतप्त पालकांची समजूत घालून गर्दी पांगवली. दरम्यान, या प्रकरणी अटकेतील मुख्याध्यापकाला न्यायालयाने बुधवारपर्यंत (१७डिसेंबर) पोलिस कोठडी सुनावली आहे.
एकनाथनगर मनपा शाळेतील मुख्याध्यापक सुरेश वाहुळे याने सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शुक्रवारी वर्ग सुरू असताना तोंड दाबून खोलीत नेऊन बलात्कार केल्याची तक्रार उस्मानपुरा पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी दाखल करण्यात आली. पोलिसांनी रात्री उशिरा वाहुळे यास अटक केली होती.
या घटनेचे शनविारी एकनाथनगर भागात तीव्र पडसाद उमटले. सकाळीच पालकांनी शाळेकडे धाव घेऊन शाळेचे गेट बंद केले. त्यानंतर मुख्याध्यापकाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. मुख्याध्यापकावर कडक कारवाई करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, अशी मागणी करीत नागरिकांनी शाळा बंद केली. उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नाथा जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देऊन त्यांनी पालकांना हुसकावले. या वेळी दिनकर ओंकार, सुरेश दाभाडे, संजय शिरसाट, सचिन दुबे, संदीप मगरे, सिद्धार्थ पवार, समाधान सावंत, बबिता शिनगारे यांच्यासह शंभरवर नागरिक जमले होते.

मुलीचे आयुष्य उद‌्ध्वस्त
-माझ्यामुलीला गुळवे या रजिस्टर आणायला, डबा आणायला मुख्याध्यापकाकडे पाठवत होत्या. मुलगी शाळेत जायचेच नाही, असे दोन दविसांपासून रडून सांगत होती. आमच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. याला जबाबदार मुख्याध्यापकावर कडक कारवाई करावी, फाशीची शिक्षा करावी. पीडितमुलीचे वडील
कारवाईसुरू आहे
-झालेल्याप्रकरणातील दोषी व्यक्तीला आम्ही अटक केली आहे. आमची कारवाई चालू आहे. पालकांनी कायदा हातात घेऊ नये. नाथाजाधव, पोलिसनिरीक्षक