आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाचा आरोपी संतोष पाटीलचा प्रवास, आठ वर्षांत बार वेटर ते डान्स बार मालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरातही तो एखाद्या गुंडासारखा वागत होता. सभ्य आईवडिलांना ते रुचले नाही. म्हणून दहावी पास झाल्यानंतर त्याला घर सोडावे लागले. त्यानंतर अवघ्या सहा वर्षांत बार मॅन म्हणून सुरुवात केलेल्या संतोष पाटलाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून लेडीज बार चालवला. हे सगळे करताना गुन्हेगारीच्या कळसावर कधी जाऊन पोहोचला हे त्यालाही कळाले नाही. तलवारीने वाढदिवसाचा केक कापण्यापासून चारचाकी वाहन चोरण्यापर्यंत अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत. हाणामारी तर त्याचे रोजचे काम. आतापर्यंतच्या त्याच्या गुन्ह्यांकडे प्रशासनाने कानाडोळा केला. यामुळे त्याची हिंमत वाढली आणि त्याने खुनासारखा गंभीर गुन्हा केला. सात वर्षांपूर्वी परभणी जिल्ह्यातील बोरी या शंभर उंबरठ्याच्या गावातून आलेल्या या २८ वर्षांच्या तरुणाने तीन गोळ्या झाडून व्यापाऱ्याचा निर्घृण खून केला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... आरोपी संतोष पाटीलचा प्रवास...