आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्रीतील मुर्शिदाबादवाडीत रानडुकराचा हल्ला; शेतमजूर गंभीर जखमी रानडुकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - मुर्शिदाबादवाडी शिवारातील एका शेतात कापूस वेचणाऱ्या शेतमजुरावर रानडुकराने हल्ला केला. या रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाला असून त्यास औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात (घाटीत) उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी (दि.११) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विष्णू भावराव शिंदे (४५, रा. मुर्शिदाबादवाडी, ता.फुलंब्री) असे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.

विष्णू शिंदे हे गावातच मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवितात. सदरील शेतमजूर हे गावातील आनंदा विटेकर यांच्या गट क्रमांक १२ मध्ये कापसाची वेचणी करीत असताना कापसाच्या शेतात लपून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर पाठीमागून येऊन जोराची झडप मारून कमरेखाली गंभीर चावा घेतला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. रानडुकराच्या हल्ल्यात सदरील शेतमजूर जागेवरच बेशुद्ध पडला, परंतु आजूबाजूला असलेल्या मजूर महिलांनी आरडाओरड करून रानडुकराला पिटाळून लावले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विष्णू शिंदे यास प्रथम उपचारासाठी फुलंब्री येथील एका खासगी दवाखान्यात व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र जखम गंभीर स्वरूपाची असल्याने सदरील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. कोऱ्हाळे, वन परिमंडळ अधिकारी डी. ए. राठोड, वनरक्षक अण्णा वाघ यांना देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...