आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लेखान्यात पथकासमोर जनावरांची कत्तल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिल्लेखान्यात चार जनावरांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरही पालिकेचे पथक काहीही करू शकले नाही. अवघ्या दोन कर्मचार्‍यांचे पथक जनावरांची कत्तल होताना पाहून मदतीसाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. ही मदत मिळेपर्यंत खाटीक कापलेल्या जनावरांसह पसार झाले.
कर्मचार्‍यांची संख्या तोकडी असल्यामुळे आम्ही अवैध मांस विक्री रोखू शकत नसल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भागवत नाईकवाडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत जाहीरपणे सांगितले होते. मंगळवारी त्यांना पुनश: प्रत्यय आला. परवानगी नसताना अवैधपणे सिल्लेखान्यात जनावरांची कत्तल करण्यात आल्याबद्दल क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याचे डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले.
साडेचारशे अधिकृत आणि तेवढीच अनधिकृत मांस विक्रीची दुकाने असलेल्या शहरात कायदेपालनासाठी पालिकेकडे फक्त दोनच कर्मचारी आहेत. त्यांना पोलिस तर सोडा खासगी सुरक्षा व्यवस्थाही देण्यात आलेली नाही. सकाळी दोन कर्मचार्‍यांचे पथक सिल्लेखान्यात गेले होते. तेथे उघड्यावरच दोन जनावरे कापल्याचे दिसून आले. पथकाने विचारणा केली असता खाटीक अंगावर धावून आले. त्यामुळे दोघेही मदतीसाठी ठाण्यात गेले. ठाण्यातून लवकर मदत मिळू शकली नाही. पोलिस आले तेव्हा खाटकांनी पुरावाच नष्ट केला होता. अलबेल असल्याचे चित्र उभे करण्यात आल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले. पाच कर्मचारी आणि तेवढेच पोलिस दिल्यास सात दिवसांत शहरातील अवैध मांस विक्री थांबवतो, असा दावा नाईकवाडे यांनी केला आहे.