आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हडको परिसरात रोज भरते जनावरांची रात्रशाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉर्ड क्रमांक 16 व वॉर्ड क्रमांक 3, हडको परिसरात भटक्या जनावरांचा उपद्रव वाढला आहे. हडकोतील नवनाथनगर, नवजीवन कॉलनी, मयूरनगर, सुभाषचंद्र बोसनगर, द्वारकानगर, सिद्धार्थ चौक, टीव्ही सेंटर रोड, संत ज्ञानेश्वरनगर, पवननगर या परिसरांमध्ये रात्री खुली मैदाने व गल्लीबोळांत ही मोकाट जनावरे आपली शाळा भरतात. त्यांच्या ओरडण्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे.
या परिसरातील रस्त्यावर ही जनावरे वेळोवेळी ठिय्या मांडतात. यामुळे वाहतुकीसही अडथळा होत आहे. महानगरपालिकेचा फिरता कोंडवाडा शहरात चारदोन भटक्या जनावरांना उचलून घेऊन जातात. मात्र, शहरात सर्व ठिकाणी अशी कारवाई होत नाही. फिरत्या कोंडवाड्याने या परिसरात रात्री गस्त घालून भटक्या जनावराना पकडावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
कर्मचारी व वाहनांची संख्या अपुरी पडत असल्याने शहरात ही समस्या आहे. शहर चारही बाजूने वाढत आहे. शहरात नेहमी फिरता कोंडवाडा फिरत असतो. हडको परिसरात सतत आठ दिवस गस्त घालून भटक्या जनावरांना कैद केले जाईल. डॉ. बी. एस. नाईकवाडे,पशुसंवर्धन अधिकारी