आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौताळ्यात जंगल सफारीची ओळख करून देणारे संग्रहालय; मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पर्यटकांना गौताळा अभयारण्यातील वनसंपदेची माहिती व्हावी या उद्देशाने अभयारण्यात सुंदर निर्वचन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात अभयारण्यात आढळणाऱ्या वन्यजीवांचा सुंदर देखावा कल्पकतेने म्युरलच्या स्वरूपात सादर केला आहे. हे निर्वचन केंद्र लहान मुलांसह मोठ्यांनाही वेगळा आनंद देणारे आहे. मात्र, उन्हामुळे पर्यटकांची संख्या घटल्याने या केंद्रातही अगदी तुरळक गर्दी दिसून येत आहे. 

मराठवाड्यातील जंगलात आढळणाऱ्या वन्यजीवांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी वर्षभरापूर्वी ही कल्पना वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी मांडली होती. त्यानंतर या कामाला वेग आला. २१ हजार चौ.मी. परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात दहा बिबटे आहेत. हरीण, नीलगाय, रानडुक्कर या प्राण्यांसह साप आणि असंख्य सरपटणारे प्राणी शंभरपेक्षा जास्त पक्ष्यांच्या जाती बघावयास मिळतात. पाटणादेवी हा रम्य परिसर, तेथील सुंदर हेमाडपंती मंदिरांचा सुंदर देखावा म्युरलच्या स्वरूपात या निर्वचन केंद्रात आहे. पहिल्या दालनात फोटो पाहावयास मिळतात, तर आतल्या दालनात आपण खऱ्याखुऱ्या जंगलात आल्याचा भास होतो. तेथे पीओपीचे हरीण, बिबट्या, रानमांजर, पक्ष्यांच्या विविध जाती, रानडुक्कर, मंदिरांचे नक्षीकाम हरखून टाकणारे आहे.
 
मराठवाड्यात पहिलाच प्रयोग...
याठिकाणी प्रवेश शुल्क नाही. अभयारण्यात जाताना रजिस्टरवर नोंद करून तसेच पार्किंग शुल्क भरल्यानंतर याच शुल्कात हे निर्वचन केंद्र पाहता येते. मराठवाड्यातील हे पहिलेच निर्वचन केंद्र आहे. येथे प्राणी पक्ष्यांची माहिती देणारी काही पुस्तकेही वन विभागाच्या वतीने जिज्ञासूंना मोफत दिली जातात. 

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त केंद्र 
वन्यजीवांचाअभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या निर्वचन केंद्राची कल्पना पुढे आली असून ती कल्पकतेने साकारली आहे. त्यात अभयारण्यातील प्रातिनिधिक स्वरूपात प्राण्यांचे देखावे आहेत. येथे आल्यावर विद्यार्थ्यांना ती माहिती मिळते. 
- बाबासाहेब जराड, वनपरिक्षेत्र अधिकारी, गौताळा. 
 
बातम्या आणखी आहेत...