आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ विद्यार्थ्यांना लुबाडले, शुल्काएवढय़ा भरपाईचे ग्राहक मंचाचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इमेज मल्टिमीडिया संगणक प्रशिक्षण संस्थेशी संलग्नित असलेल्या क्रिएटिव्ह मीडियाच्या झोन या संस्थेने अँनिमेशन कोर्सच्या नावाखाली नऊ प्रशिक्षणार्थींकडून घेतलेली 4 लाख 37 हजार 800 रुपयांची रक्कम परत करून एवढीच रक्कम नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष के. एन. तुंगार, सदस्य के. आर. ठोले व र्शीमती एस. एस. बारलिंगे यांनी दिला.

अभ्यासक्रमानुसार अँनिमेशनची 19 सॉफ्टवेअर्स प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील. यात 2डी अँनिमेशन, 3डी अँनिमेशन, व्हीएफएक्स, गेम डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट, इंटेरिअर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग आदींचा होता. याशिवाय इंग्लिश संभाषण, व्यक्तिमत्त्व विकास, स्केचिंग, ज्वेलरी डिझाइनचे प्रशिक्षण दिले जाणार होते.

संपूर्ण अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क 1 लाख 20 हजार ठरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी 60 हजार रोख देणे आवश्यक होते. उर्वरित रक्कम स्कॉलरशिप म्हणून परत देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मुलींसाठी कोर्सची फ ी एक लाख ठरवली होती. 40 हजार रोख व उर्वरित स्कॉलरशिपच्या माध्यमातून परत मिळणार होती. प्रत्यक्षात स्कॉलरशिपसाठी 2 डी अँनिमेशन प्रशिक्षण घेण्यास सांगितलेले असतानाही शेवटपर्यंत प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. कोर्स सुरू झाल्यानंतर केवळ कोरल व फोटोशॉप शिकवण्यात आले.

मोहंमद अब्दुल मतीन (36,000), शेख सलमान श्ेख अब्दुल अजीज (58,600), खान अफरोज (47,100), मोहंमद इरफान (47,100), मोहंमद अमीन (30,100), मोहंमद इम्रान (47,100), शेख निलोफर (37,600), शेख अहमदोद्दीन (55,600), काझी मुखीम पिता मोइन (58,600) यांनी विविध कालावधीत अँनिमेशन कार्ससाठी रक्कम भरली.

मंचाचा निर्णय :संगणक प्रशिक्षण संस्थेने 30 दिवसांच्या आत अर्जदारांनी भरलेली रक्कम त्यांना परत करावी व तेवढीच रक्कम (चार लाख 37 हजार आठशे रुपये) नुकसान भरपाई म्हणून द्यावी. तक्रार खर्चापोटी अर्जदारास प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात यावेत. रक्कम न दिल्यास रकमेवर आठ टक्के दराने व्याज देण्याचा आदेश दिला.