आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंकित बावणेला रणजी कर्णधारपदाची संधी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ट युवा क्रिकेटपटू अंकित बावणेची महाराष्ट्र रणजी संघाच्या कर्णधारपदी निवड होऊ शकते. या सत्रातील ते ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या पहिल्या लढतीला नवी दिल्लीत सुरुवात झाली असून पहिलाच दिवशी अंकितने शानदार अर्धशतक झळकावून आपण फॉर्मात असल्याचे सिद्ध केले.
गुरुवारी बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध वनडेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडियात महाराष्ट्र रणजी संघाचा कर्णधार केदार जाधवचीही निवड झाली अाहे. भारत-न्यूझीलंड वनडे मालिका १६ ते २९ ऑक्टोबर या काळात होणार असेल. यामुळे या काळात केदार जाधव महाराष्ट्र रणजी संघाकडून खेळू शकणार नाही. त्याच्या जागी औरंगाबादच्या अंकित बावणेची महाराष्ट्र रणजी संघाच्या कर्णधारपदी निवड होऊ शकते. केदारची जागा घेण्यासाठी शर्यतीत अंकित पुढे आहे.

महाराष्ट्राच्या रणजी संघात ६० प्रथम श्रेणी सामने खेळणारा सध्या अंकित बावणे अनुभवी खेळाडू असल्याने संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. गेल्या सत्रात उजव्या हाताच्या या फलंदाजाने दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावून सर्वाचे लक्ष वेधले होते. त्याने वीरेंद्र सेहवाग सारखा दिग्गज खेळाडू असलेल्या हरियाणा संघाविरुद्ध १७२ धावांची दमदार खेळी केली होती. त्याने आपल्या ऑफ ब्रेक फिरकीवर प्रथम श्रेणीत १० बळी घेत गोलंदाजीतील चुणूक दाखवली.

बातम्या आणखी आहेत...