आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकित बावणेला उत्कृष्ट रणजी फलंदाज पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रणजी क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शनामुळे औरंगाबादचा युवा क्रिकेटपटू अंकित बावणेला एमसीएचा उत्कृष्ट रणजी फलंदाज पुरस्कार मिळाला आहे. शनिवारी बीसीसीआयचे सचिव व एमसीएचे अध्यक्ष अजय शिर्केंच्या हस्ते त्याला पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला.
अंकितने मागच्या सत्रात ८५० धावा ठोकून महाराष्ट्राला क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचवले होते. त्याने २ शतके व ५ अर्धशतके ठोकली. अंकितने आजवर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६० सामने खेळले असून ३९७६ धावा केल्या व १३ शतके आणि २२ अर्धशतके काढली.
यंदा विजेतेपद
उत्कृष्ट फलंदाजी करून चांगले योगदान देईन.यंदा महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यासाठी कसून सराव करत आहे.
- अंकित बावणे, रणजीपटू
बातम्या आणखी आहेत...