आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकुरमध्ये औरंगाबादची बाजी, ७५ पारितोषिके पटकावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे १९ ते २२ सप्टंेबरदरम्यान तुळजापूर येथे पार पडलेल्या ‘अंकुर’ केंद्रीय युवक महोत्सवात औरंगाबाद जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी सुमारे ७५ पारितोषिके पटकावली. त्या खालोखाल बीड जिल्ह्याचा क्रमांक आहे.
सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, कुलगुरू डाॅ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डाॅ. प्रदीप जब्दे, संचालक डाॅ. सुहास मोराळे यांच्या हस्ते गुरुवारी पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. औरंगाबाद जिल्ह्याशी संबंधित निकाल थोडक्यात असा. शोभायात्रा - द्वितीय - शिवाजी महाविद्यालय कन्नड, तृतीय - शिवछत्रपती महा., औरंगाबाद. संगीत - प्रथम - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, द्वितीय स.भु. विज्ञान, औरंगाबाद, तृतीय - देवगिरी. उपशास्त्रीय गायन - प्रथम - स.भु. विज्ञान, तृतीय - देवगिरी. शास्त्रीय तालवाद्य - प्रथम - शिवाजी महा. कन्नड, तृतीय - शासकीय ज्ञान विज्ञान, शास्त्रीय सूरवाद्य - प्रथम - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. सुगम गायन - प्रथम - विवेकानंद महा. , द्वितीय - देवगिरी. सुगम गायन पाश्चात्त्य - प्रथम - देवगिरी, द्वितीय - शासकीय अभियांत्रिकी, तृतीय - स.भु. कला, वाणिज्य. समूह गायन भारतीय - प्रथम - देवगिरी, द्वितीय - सरस्वती कला, वाणिज्य महाविद्यालय, तृतीय - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. समूह गायन पाश्चात्त्य - प्रथम - देवगिरी, द्वितीय - विवेकानंद, तृतीय - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. लोकवाद्यवृंद - प्रथम - देवगिरी, द्वितीय - शिवाजी महाविद्यालय कन्नड, तृतीय - विवेकानंद. शास्त्रीय नृत्य - प्रथम - विवेकानंद, तृतीय - देवगिरी, एकांकिका प्रथम - केएसके बीड, द्वितीय - जेएनईसी, तृतीय - सभु कला, वाणिज्य. मिमिक्री - प्रथम - देवगिरी, द्वितीय - शासकीय अभियांत्रिकी, तृतीय - विवेकानंद. मूकाभिनय - प्रथम - देवगिरी, द्वितीय - यशवंतराव चव्हाण महा. सिल्लोड. चित्रकला - प्रथम - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तृतीय - शासकीय कला महा.. कोलाज - प्रथम - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मृदामूर्तिकला - प्रथम - शासकीय कला महा., द्वितीय - देवगिरी. व्यंगचित्रकला - प्रथम - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, द्वितीय - शासकीय अभियांत्रिकी महा. रांगोळी - प्रथम - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, द्वितीय - शासकीय कला महा. पोवाडा - प्रथम - देवगिरी. भारूड - प्रथम - शिवाजी महाविद्यालय कन्नड, द्वितीय - देवगिरी, तृतीय - यशवंतराव चव्हाण महा. सिल्लोड. वासुदेव गीत प्रथम - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. गोंधळ - प्रथम - यशवंतराव चव्हाण महा. सिल्लोड, द्वितीय - देवगिरी, तृतीय- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. भजन - प्रथम - देवगिरी, तृतीय - शिवाजी महाविद्यालय कन्नड. लोकगीत - प्रथम - देवगिरी, तृतीय - विवेकानंद. लोकनाट्य - प्रथम - देवगिरी, द्वितीय - विवेकानंद. लावणी - प्रथम - देवगिरी, द्वितीय - विवेकानंद महाविद्यालय.

विद्यापीठाच्या संघांचा तुळजापुरात डंका
सर्वयुवक महोत्सवांमध्ये विविध कलाप्रकारांतील पारितोषिकांवर नाव आपले कोरणाऱ्या विद्यापीठाच्या संघाचे यंदाच्या अंकुर युवक महोत्सवातही सरस कामगिरी केली. शास्त्रीय सूरवाद्य, चित्रकला, व्यंगचित्र, रांगोळी, कोलाज, वासुदेव गीत आदी स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावतानाच अन्य स्पर्धांतही बक्षीसे पटकावली.
बातम्या आणखी आहेत...