आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा हजारेंचा व्ही.के.सिंहाच्या प्रचारास नकार, ममतांच्या ध्येय धोरणांचा पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील सहकारी आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के.सिंह यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या राजकारण प्रवेशाचे स्वागत करतानाच त्यांचा निवडणूक प्रचार करणार नसल्याचे अण्णांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ध्येय धोरणांचा त्यांनी पुरस्कार केला आहे.
येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमीत्त आलेल्या अण्णांनी आगामी लोकसभा निवडणूकीत स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना लोकसभेत पाठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.
निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांच्या भाजप प्रवेशावर ते म्हणाले, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. माणसाचे मन हे चंचल असते. आता त्यांना आंदोलनाऐवजी राजकारणातून प्रश्न सुटतील असे वाटले असेल, म्हणून ते भाजपमध्ये गेले असावेत.
पुढील स्लाइडमध्ये, राजकीय पक्षांचा प्रचार केला नाही आणि करणार नाही