आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Lashkare Murder Case,latest News In Divya Marathi

सहा आरोपींना जन्मठेप, नेवासा येथील अण्णा लष्करे हत्या प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील अण्णा लष्करे यांच्या हत्येप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तिसरे सत्र न्यायाधीश एस. जी. शेट्ये यांनी शुक्रवारी सुनावली. शेख राजू गुलाब ऊर्फ राजू जहागीरदार, शेख एजाज गुलाब ऊर्फ मुन्ना जहागीरदार, शेख जावेद ऊर्फ पेंटर शेख शेरू, मुनेर ऊर्फ मुन्ना निझाम पठाण, सय्यद सर्फराज अब्दुल कादर आणि शेख मुश्ताक अहमद गुलाम रसूल हे सहा जण आरोपी आहेत. सर्व जण नगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यापैकी अल्ताफ अब्दुल कादर बेग यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. 18 मे 2011 रोजी नगर नाका सर्कलजवळ लष्करे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण चिघळले होते. घटनेनंतर छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती.
अशी घडली होती घटना
अण्णा ऊर्फ सुनील लष्करे, पत्नी पूजा, मुली प्रिया, वैष्णवी आणि शेजारी मनोज धोत्रे हे सर्व जण नेवासा येथून औरंगाबादला खरेदीसाठी िनघाले होते. दरम्यान, त्यांच्या अ‍ॅसेंट कारच्या (एमएच 04 एडब्ल्यू 3663 ) मागावर मारेकरी होते. लष्करे खडका फाट्यावर पेट्रोल भरण्यासाठी आले असता मुन्ना जहागीरदार आणि मुनीर पठाण यांनी अण्णांसोबत भांडण केले. त्यांचे भांडण पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सोडवले. त्यांची कार नगर नाक्याजवळ येताच एका नॅनो कारने धडक दिली. लष्करेंनी त्याला जाब िवचारण्यासाठी कार थांबवली. याच वेळात दोन मोटारसायकलींवर सहा जण आले आणि त्यापैकी तिघांनी अण्णांचे हात धरले, तर उर्वरित तिघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पूजाने एका हल्लेखोराला मज्जाव करत असताना दोघांमध्ये झटापट झाली आणि त्याचा मोबाइल खाली पडला. गोळ्या झाडल्यानंतर सर्वच आरोपी फरार झाले. पूजा यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर एक कारचालक थांबला आणि त्याने अण्णांना घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
साक्षीदार ठरले महत्त्वाचे : या प्रकरणात एकूण 38 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र मुगदिया, तर फिर्यादीकडून अ‍ॅड. जे. बी. नवले आणि अ‍ॅड. सुनील आर. चावरे यांनी बाजू मांडली. या साक्षीदारांमध्ये घटनेच्या दिवशी लष्करे हे खडका फाट्यावरील पंपावर पेट्रोल भरत असताना जे भांडण झाले होते ते त्याबाबत अमोल शिरसाट यांनी भांडण कसे केले याबाबत कर्मचाऱ्यांनी साक्ष दिली. तसेच मोहनबापू कुसळकर यांनी साक्ष दिली की, ते राजू जहागीरदार यांच्याकडे चहा द्यायला गेले असता लष्करेंच्या खुनाबाबत चर्चा करत असल्याचे ऐकले होते. तसेच प्रत्यक्षदर्शी पूजा लष्करे आणि मनोज यांनी आरोपींना ओळखले.
मला न्याय मिळाला : या घटनेनंतर पूजा लष्करे यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. ज्या पद्धतीने ही घटना घडल्यानंतरही माझ्यावर मोठा दबाव होता. माझे पती शिवसेनेचे पदाधिकारी होते. केवळ राजकीय वैमनस्यातून त्यांची हत्या करण्यात आली. मात्र, सरकारी वकील तसेच तपास अधिकारी टीमने मला खूप सहकार्य केले.
विशेष शाखेने पकडले : अण्णा लष्करे यांच्या हत्येनंतर आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी विशेष शाखेकडे सोपवण्यात आली होती. हत्येनंतर बराच काळ उलटून गेल्यानंतरही आरोपींचा शोध लागत नव्हता. विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे, सहायक पोलिस निरीक्षक गौतम पातारे, पो. कॉ. गणेश वैराळकर, दुडकू खरे, बाळाराम चौरे, रेवण्णा गवळी आदींनी इंदूर (मध्य प्रदेश) येथून मुन्ना जहागीरदार व मुन्ना पठाण यांना पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तुले व राउंड जप्त केले होते. यानंतर इतर आरोपी पकडण्यात यश मिळाले.
दाखल केले. डॉक्टरांनी तपासून अण्णांना मृत घोषित केले.
साक्षीदार ठरले महत्त्वाचे...
या प्रकरणात एकूण 38 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र मुगदिया, तर फिर्यादीकडून अ‍ॅड. जे. बी. नवले आणि अ‍ॅड. सुनील आर. चावरे यांनी बाजू मांडली. या साक्षीदारांमध्ये घटनेच्या दिवशी लष्करे हे खडका फाट्यावरील पंपावर पेट्रोल भरत असताना जे भांडण झाले होते ते त्याबाबत अमोल शिरसाट यांनी भांडण कसे केले याबाबत कर्मचाऱ्यांनी साक्ष दिली. तसेच मोहनबापू कुसळकर यांनी साक्ष दिली की, ते राजू जहागीरदार यांच्याकडे चहा द्यायला गेले असता लष्करेंच्या खुनाबाबत चर्चा करत असल्याचे ऐकले होते. तसेच प्रत्यक्षदर्शी पूजा लष्करे आणि मनोज यांनी आरोपींना ओळखले.

मला न्याय मिळाला...
या घटनेनंतर पूजा लष्करे यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. ज्या पद्धतीने ही घटना घडल्यानंतरही माझ्यावर मोठा दबाव होता. माझे पती शिवसेनेचे पदाधिकारी होते. केवळ राजकीय वैमनस्यातून त्यांची हत्या करण्यात आली. मात्र, सरकारी वकील तसेच तपास अधिकारी टीमने मला खूप सहकार्य केले.