आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Meeting Of The 'APP' Of Topyanna Pravesabandi Role Of AAP

अण्णांच्या सभेत ‘आप’च्या टोप्यांना प्रवेशबंदी - आप ची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची 6 फेब्रुवारीला सांस्कृतिक क्रीडा मंडळ खडकेश्वर येथे सभा होणार आहे. या सभेला कार्यकर्त्यांनी गेल्यास पक्षाची हरकत नाही; परंतु आम आदमी पार्टीच्या टोप्या घालून जाण्यास मनाई करण्यात आल्याचे पक्षाचे महाराष्ट्र राज्य समिती सदस्य संजीव साने यांनी बुधवारी पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
अण्णांच्या उपस्थितीत गुरुवारी लोकपाल विधेयकाच्या अधिनियमांच्या प्रतींचे लोकार्पण केले जाईल. अँड. सतीश तळेकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘आप’चे कार्यकर्ते सभेला आल्याचे अण्णांना आवडत नाही. त्यामुळे पक्षाच्या टोप्या घालून कार्यकर्त्यांनी सभेला जाऊ नये, असे साने यांनी सांगितले. दरम्यान, आज समाजवादी जन परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा हमाल माथाडी, कष्टकर्‍यांचे नेते सुभाष लोमटे यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला. साने यांनी ‘आप’ची टोपी घालून त्यांना पक्षात प्रवेश दिला. लोमटे यांच्यासह समाजवादी जन परिषदेचे अँड. सुभाष सावंगीकर, सय्यद कासमभाई व देविदास कीर्तिशाही हेदेखील ‘आप’मध्ये दाखल झाले. लोमटे म्हणाले, ‘आप’च्या माध्यमातून सकारात्मक प्रयोग होत असल्यामुळे त्यात काम करण्याचा निर्णय घेतला. निवडणूक लढवणे अस्पृश्य नसल्याचेही लोमटे यांनी स्पष्ट करून लोकसभेसाठी आपण उमेदवार असल्याचे संकेत दिले. पत्रकार परिषदेला पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मानव कांबळे, औरंगाबाद जिल्हा समन्वयक मनीषा चौधरी, सचिव हरमितसिंग आदींची उपस्थिती होती.