आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Annabhau Giving Pretigious To The Workers : Dr Fakruddin Bennur

अण्णाभाऊंनी कष्टकर्‍यांना प्रतिष्ठा दिली : डॉ. फक्रुद्दीन बेन्नुर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नव्हे तर कष्टकर्‍यांच्या तळहातावर तरली आहे. अशी वैचारिक स्पष्टता मांडणार्‍या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी समाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन सर्मपित केल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. फक्रुद्दीन बेन्नुर यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्रा तर्फे ‘औद्योगिक भांडवलशाही व कामगारांच्या चळवळीपुढे पेच’ या विषयावर मंगळवारी (19 मार्च 2013) त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते, अध्यक्षस्थानी प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. उमेश बगाडे होते. व्यासपीठावर पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. यशवंत सुमंत, केंद्राचे संचालक डॉ. बी. एस. वाघमारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

डॉ. बेन्नुर म्हणाले, भारतामध्ये मोठय़ा प्रमाणात असंघटित कामगार वर्ग आहे. या वर्गाचा अभ्यास होणे चळवळीच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे. परिवर्तन करायचे असेल तर शोषणाची जाणीव करून दिली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. डॉ. अफाक खान, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. पुष्पा गायकवाड आणि हनुमंत सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले.