आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी पवार, संगीता धायगुडे यांना पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाडा साहित्य परिषद खुलताबादच्या वतीने यावर्षीपासून दिले जाणारे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले. कै. पांडुरंग पाटील अधाने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पांडुरंग स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार कवी प्रा. रवी पवार (पुणे) यांना त्यांच्या लोकल भावनांचं कार्पोरेट ब्रँडींग या कवितासंग्रहास तर उपायुक्त संगीता धायगुडे (ठाणे) यांच्या हुमान या आत्मकथनास पोपटराव भदाने राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला. मसाप शाखा खुलताबादचे अध्यक्ष डॉ. ललित अधाने, उपाध्यक्ष विष्णू सुरासे कार्यवाह राजेंद्र चव्हाण यांनी पुरस्कारांची घोषणा केली.
पुरस्काराच्या निवडीसाठी तज्ञांची समिती गठित करण्यात आली. यात डॉ. अनिरुद्ध मोरे, डॉ. कैलास अंभोरे डॉ. कैलास गळे यांचा समावेश होता. या पुरस्कारांचे वितरण १७ मे रोजी "वसंतोत्सव-२०१५' मध्ये प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या हस्ते करण्यात येईल. मसाप शाखा खुलताबाद, उन्मती प्रतिष्ठान, श्री शिव संगमेश्वर दूध उत्पादक संस्था, विरमगाव येथील शिवसंगमेश्वर वाचनालय यांच्यातर्फे हा सोहळा होणार आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, डॉ. डी. व्ही. माने, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. ज्योती अधाने, अंबादास अधाने, बाळासाहेब अधाने, ज्ञानेश्वर माऊली अधाने यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...