आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्गासाठी दहा गावांचे जमिनीचे दर जाहीर, गंगापूर जहांगीरमध्ये एकराला 84 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील १० गावांसाठीचे भूसंपादनाचे बुधवारी दर जाहीर झाले. सर्वाधिक ८४ लाख रुपये प्रतिएकर दर गंगापूर जहांगीरच्या जमिनींना तर त्या खालोखाल वरुडला एकरी ६९ लाख रुपये दर जाहीर झाला आहे. दौलताबादला एकरी ४५ लाख ७४ हजार रुपये दर मिळाला आहे.बागायती जमिनींना अपेक्षित दर मिळाल्याने पहिल्या टप्प्यातील २३ गावांचे शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे आता उद्यापासून या १० गावांतील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय येतील याकडे लक्ष लागले आहे.
 
सुपीक जमिनी जात असल्याने समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध सुरु असतानाच सरकारने भूसंपादनाचे दर जाहीर केले आहेत. दहा दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यात २३ गावांचे दर जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या यादीकडे लक्ष लागले होते. बुधवारी १० गावांतील चार गटांच्या जमिनीचे दर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीला संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना ठरलेल्या मोबदला रकमेवर २५ टक्के वाढीव रक्कम मिळेल.
 
दर जाहीर झालेल्या १० गावांत गंगापूर जहांगीर, वरुड दौलताबाद येथील जमिनींना सर्वोच्च दर जाहीर झाला आहे. संपूर्ण फळबागांचा भाग असलेली ही गावे आहेत. गंगापूर जहांगीरला हेक्टरी कोटी १० लाख रु. म्हणजेच एकरी ८४ लाख रुपये दर जाहीर झाला अाहे. वरुडलाही हेक्टरी कोटी ७२ लाख रु अर्थात एकरी ६९ लाख रुपये दर असेल तर दौलताबादला हेक्टरी कोटी १४ लाख ३५ हजार रुपये अर्थात एकरी ४५ लाख ७४ हजार रुपये दर असेल.
 
दर तुलनेने कमीच
समृद्धीमहामार्गामुळे गावचे दोन भाग होत आहेत. या भागात पाणी मुबलक असल्याने उत्पन्न चांगले आहे. चांगल्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. शेंद्रा एमआयडीसी लगतच्या या जमिनीचे दर अपेक्षेप्रमाणे नाहीत. बळीराममत, जयपूरचे शेतकरी
 
आधीच दर जाहीर झालेल्या २३ गावांत संभ्रम, त्यात नवी भर
१०दिवसांपूर्वी ज्या २३ गावांचे दर जाहीर झाले त्या गावांत हे दर समाधानकारक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तेथे बागायती शेती जिरायती दाखवून दर ठरवल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे दर जाहीर होऊनही शेतकऱ्यांनी समंतीपत्रे देण्याची तयारी दर्शवलेली नाही. त्यात आता या दहा नवीन गावांची भर पडणार आहे.
 
पुरेपूर मोबदला देणार
समृद्धीमहामार्गासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना खरेदी-विक्री नियमाप्रमाणे पुरेपूर मोबदला देण्याची प्रशासनाची भूमिका आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षा, जमिनीचे बाजारमूल्य लक्षात घेऊन नियमानुसार जमिनीचे दर निश्चित करावेत आणि भूसंपादनाचे काम वेगाने पूर्ण करावे.
- नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी ( दर निश्चिती बैठकीत)
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, 10 गावांतील जमिनीचे दर...
बातम्या आणखी आहेत...