आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील वॉर्डावॉर्डांत उभारु गांडूळ खताचा प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- 'दिव्य मराठी'च्या सहकारातून समस्यामुक्ती या उपक्रमातून प्रेरणा घेत सिडको एन-३ मधील सूर्या पार्कमध्ये गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी श्रीकृष्ण चिंचोरकर यांची उपस्थिती होती. या प्रकल्पासाठी राहुल इंगळे यांनी पुढाकार घेतला आहे.
कचऱ्याच्या समस्येवर मात करून वॉर्डावॉर्डांत गांडूळ खत प्रकल्प उभे करण्याचा मानस इंगळे नागरिकांनी व्यक्त केला. पर्यावरणदिनी आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शहरातील खुल्या जागा, उद्याने आणि जेथे कचरा टाकला जातो अशा ठिकाणी वृक्षारोपण करून या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या गांडूळ खताचा वापर वृक्षलागवडीसाठी करणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यात योगदान देणार असल्याचे नगरसेवक ए. के. शेख, नगरसेविका सत्यभामा शिंदे यांनी जाहीर केले.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून तो घंटागाडीत टाकण्यापेक्षा एकत्रित करून गांडूळ खत, कंपोस्ट खत आणि बायोगॅसचे प्रकल्प उभारण्याचा निर्धार केला. श्रीकृष्ण चिंचोरकर, "दिव्य मराठी' डीबी स्टारचे प्रमुख रुपेश कलंत्री यांनी मार्गदर्शन केले. बी. डी. भूमकर यांनी कंपोस्ट खत निर्मितीवर, तर मंगेश गरड यांनी बायोगॅस निर्मितीवर अभ्यासात्मक माहिती दिली. या वेळी ज्येष्ठ नागरिक वॉकर्स क्लबचे विजयकुमार भोसले, के. ई. हरदास, प्रा. डाॅ. एल. बी. रायमाने, ना. धो. शित्रे गुरुजी, सुरेश यावलकर, शिवाजी रामरुले, डॉ. शिवाजी धनवाले, व्ही. एल. जाधव, अॅड. यतीन ठोले, आशिष सुरडकर, अलका अमृतकर, सुनंदा केळे, विद्या शिरगुडे, छाया तुल्ले, कल्पना जोशी, अनुराधा इराळे आदींची उपस्थिती होती. स्मिता देवळाणकर यांनी सूत्रसंचालन केले. राहुल इंगळे यांनी आभार मानले.
उपक्रम राबवण्याचा मानस
- हा उपक्रम स्तुत्य आहे. मॉर्निग वॉकर्स ग्रुपतर्फे आम्ही असा प्रकल्प प्रत्येकाच्या घरात निर्माण करू. यासाठी सर्व सदस्यांची बैठक घेणार आहोत.
के. ई. हरदास, निवृत्तसाखर संचालक.
- महिला मंडळाच्या दोनशे महिलांची बैठक घेऊन कचरा व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ. घराघरांत कंपोस्ट खत आणि गांडूळ खताचा आणि बायोगॅसचा उपक्रम हाती घेणार आहोत.
अलका अमृतकर, अध्यक्षा, स्फूर्ती महिला मंडळ
बातम्या आणखी आहेत...