आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच केंद्रावर २८०० उत्तरपत्रिका कशा?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उत्तरपत्रिका फेर लेखन रॅकेट प्रकरणाने नवे वळण घेतले असून गोपनीय शाखेतून वितरण होताना प्रतिशिक्षक दोनशे उत्तपत्रिका देणे आवश्यक आहे. परंतु कोणत्याही प्रकारची विचारणा करता एकाच केंद्रावर २८०० उत्तरपत्रिकांचे वितरण झाले कसे, असा सवाल मंडळाने उपस्थित केला आहे. औरंगाबाद विभागातून कुठे आणि किती उत्तरपत्रिकांचे वितरण झाले, याचा अहवाल मंडळाने मागवला असून ४८ तासांपेक्षा अधिक वेळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सहा लिपिकांना निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी प्राप्त झाले आहेत.
जालन्यातील संस्कार निवासी वसतिगृहावर छापा टाकून पोलिसांनी बारावीच्या उत्तरपत्रिका फेरलेखन घोटाळ्याचे रॅकेट उजेडात आणले होते. या प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी डी. आर. ब्रह्मपूरकर, योगेश पालेपवाड, दीपक शिंदे, अशोक नंद, आर. व्ही. गायकवाड, पी. पी. देऊळगावकर यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य मंडळाने दिले आहेत. तसेच आतापर्यंत पोलिसांनी पकडलेल्या सर्वांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. २०१६ च्या सर्व कामाची विभागणी कशी करण्यात आली याची माहिती मागवण्यात आली आहे. तसेच बाजारसावंगी येथे २८००, राणी उंचेगाव येथे ६००, बायोगी २६००, या केंद्रांवर इतक्या उत्तरपत्रिकांचे वितरण झाले कसे, अशी विचारणा केली आहे.

अधिकाऱ्यांना कारणे दाखवा
मंडळामध्ये परीक्षेसंदर्भातील सर्व कामे गोपनीय स्वरूपात असतात. हे काम प्रमुख म्हणून आर. जी. पुरी आणि एन. वाय. बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यांच्या अखत्यारीत लिपिक देण्यात आले होते. उत्तरपत्रिकांच्या रॅकेट प्रकरणात चुकीच्या पद्धतीने केंद्रांना उत्तरपत्रिकांचे अलॉटमेंट करण्यात आले. ही बाब का लक्षात आली नाही, केवळ या प्रकरणाचा खुलासा म्हणून चालणार नाही तर बेजबाबदार म्हणून दोन्ही प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.