आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निनावी अर्जांच्या चौकशीला ‘अँटी करप्शन’चा अग्रक्रम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भ्रष्ट्राचाराला आळा बसावा, शासनातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर वचक राहावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केवळ निनावी अर्जांच्या चौकशीतच अधिक रस असल्याचे चित्र पुढे आले आहे. निनावी अर्ज फार गांर्भीयाने घेण्याची गरज नसल्याचे आदेश गृह विभागाचे असतानाही गोपनियतेच्या नावाखाली हा विभाग निनावी पत्राच्या आधारावरून चौकशीच्या नावाखाली अनेकांची छळवणूक केली जात आहे.

औरंगाबाद परिक्षेत्राच्या शहरातील कार्यालयात पाच युनिटच्या मदतीने भ्रष्टाचार रोखण्याची आणि कार्यवाही करण्याची जबाबदारी पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने होते. जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे आहे. या युनिटचे काम डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्‍याच्या वतीने चालते. त्यांच्या मदतीला 9 पोलिस निरीक्षक आणि 34 कर्मचारी आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 2012 मध्ये सर्वाधिक 23 केसेस या विभागाने केल्या आहेत. निवृत्त अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्याविरुद्ध आलेल्या निनावी तक्रारींची दखल घेऊन चौकशी केल्याचे प्रमाण अधिक आहे. गोपनियतेच्या नावाखाली करण्यात येणार्‍या चौकशीमुळे काही जणांचा मानसिक छळ होत आहे. निनावी तक्रारींची रीतसर नोंद केली जात नाही. निनावी अर्जात ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे अशा संबंधितांना रीतसर चौकशीचे पत्रही देण्यात येत नाही. अशा प्रकारे अनेकांच्या निनावी तक्रारींची दखल घेऊन त्यांची चौकशीही केली जाते. मात्र, कालांतराने त्यांच्या विरोधात काहीही कारवाई केली जात नाही. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या विभागाकडून केवळ आठवडाभर कार्यक्रम राबवले जातात त्या पलीकडे काहीही केले जात नाही.

मागील वर्षी गळाला लागलेले लाचखोर
वजने मापे 1, पोलिस 9, भूमी अभिलेख 1, महसूल 2, आरोग्य 1, विधी न्यायालय विभाग 1, शिक्षण 1, खासगी व्यक्ती 1 आणि जिल्हा परिषद 4 अशी प्रकरणे आहेत.

तीन प्रकारची चौकशी करतो
आम्ही तीन प्रकारच्या प्रकरणात चौकशी करतो त्यात नागरिकाचे काम ज्या अधिकार्‍याकडे आहे. तो जर काम करण्यासाठी पैसे मागत असेल, तर त्याला पैसे देताना रंगेहाथ पकडून कारवाई करतो. एखादा अधिकार्‍याची नियुक्ती होऊन पाच वर्षे उलटली असतील तर त्याने कोट्यवधी रुपये जमवले असतील, तर त्यांची निनावी तक्रार आली तरी आम्ही चौकशी करू शकतो. अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार केला असेल तर त्यांची चौकशी करू शकतो. संजय बाविस्कर, पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक

अशी आहे कार्यालयीन रचना
या विभागात पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक, जमादार सर्व पदे पोलिस दलातून बदली किंवा पदोन्नतीने भरली जातात.

कार्यरत अधिकारी, कर्मचारी

पोलिस अधीक्षक : 1, डीवायएसपी : 4,
पोलिस निरीक्षक :9 (औरंगाबाद युनिट)
सहा. उपनिरीक्षक आणि हवालदार : 34.

वर्षभर हेलपाटे घालावे लागले
मी भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी पदावरून निवृत्त होऊन नऊ वर्षे उलटली. मात्र, माझ्या नावाची निनावी तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. ही तक्रार 2011 मध्ये झाली होती. मला 2012 पर्यंत अनेक वेळा बोलावण्यात आले. मी गेल्या दहा वर्षांत एकही प्लॉट अथवा घर विकत घेतले नाही. आजही मी वडिलोपाजिर्त माती आणि पत्र्याच्या घरात राहतो. जुने काही प्लॉट घेतलेले आहेत. त्यांच्या किमती वाढल्या आहेत. चौकशीत माझ्याकडे काहीही निघाले नाही. मला काही वेळ मात्र भीती वाटली होती. बाबूराव हिवराळे, निवृत्त अधिकारी