आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anti Swinflu Compaign Starts All Over The Fulambri Taluka

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुलंब्री तालुक्यात स्वाइन फ्लू प्रतिबंधक अभियान होणार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - पावसाळा सुरू असल्याने तालुक्यात दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यात आता सगळीकडे गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. या काळात स्वाइन फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक अभियान राबवणार येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास विखे यांनी दिली.
ताप, घसादुखी, घशात खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी ही स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसू लागल्यास नागरिकांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. जनसंपर्क कमी करावा. वरवर सामान्य वाटणारा ताप अंगावर न काढता शक्यतो लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. विखे यांनी सांगितले. ते म्हणाले की, विशेष म्हणजे ज्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग आहे अथवा जुनाट आजार असलेल्यांनीदेखील डॉक्टरांकडे जावे. गरोदर महिलेची या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. हा आजार (एन्फ्लुएन्झा एएच 1 एन 1) टाळण्यासाठी वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावेत. पौष्टिक आहाराचे सेवन करावे.


आहारामध्ये लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री तसेच हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा. धूम्रपान टाळावे, पुरेशी झोप तसेच विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. शिंकताना नाकावर हातरुमाल धरावा. एन्फ्लुएन्झा एन 1 एच 1 टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असेही सांगितले. या वेळी भाऊसाहेब साबळे, हरिश्चंद्र शेळके, सी. एम. रमणे, धनराज चव्हाण, चंद्रकांत लोखंडे, नरेश खडसे, एम. व्ही. मुप्पलवाड आदींची उपस्थिती होती.


नागरिकांना आवाहन
हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नयेत तसेच स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. या रुग्णाबाबत काही अडचणी असल्याने त्यांनी आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.