आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडमध्ये 14 विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल, दहशतवाद विरोधी सेलची धडक कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - व्यवसायाची माहिती देणे बंधनकारक असताना काही व्यापाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली नसल्याने शहरातील चौदा विक्रेत्यांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. 
 
देशात वाढत असलेल्या दहशतवादी कारवायांना लक्षात घेऊन औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात कोणतेही समाजविघातक दहशतवादी कृत्य घडू नये म्हणून दहशतवादी कारवायांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता डॉ.आरती सिंह, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांनी जिल्ह्यात सीआरपीसी कलम लागू केले आहे.  त्यानुसार कार्यक्षेत्रात येणारे सायबर कॅफे, सिम विक्रेते, भंगार विक्रेते यांनी त्यांच्या व्यवहार विवरणाची माहिती पोलिस ठाण्यास देणे बंधनकारक केले  होते. परंतु  या विक्रेत्यांनी त्यांची व्यवहार विवरणाची माहिती पोलिस ठाणे कन्नड शहर येथे दिली नसल्याने दि.१३ जुलै रोजी कन्नड शहरातील शेख मजीत शेख यासीम भंगार खरेदी-विक्रेता, ज्ञानेश्वर मूलचंद पवार सायबर नेट कॅफे, शशांक अशोकराव महदने सायबर नेट कॅफे, पुढील ११ सर्व सिमकार्ड विक्रेता आहेत यात  सय्यद सलीम सय्यद चांॅद, इसरार खान बन्ने खान पठाण, धृवकुमार हुकूमचंद पिरथानी, रफीक जब्बार मन्सुरी, विनोद रामगोपाल भारुका, रितेश विनोद भारुका, शेख अशपाक शेख शेरू, रावसाहेब पंढरीनाथ दाबके, विनोद हरकचंद जैन, राजकुमार शांतीलाल चुडीवाल आदी ११  सिमकार्ड विक्रेते, २ सायबर नेट कॅफे मालक, एक भंगार विक्रेता यांच्यावर  एकूण ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  
 
ही कारवाई औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह  यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी सेलचे पोलिस उपनिरीक्षक  बालाजी ठाकूर, मधुकर मोरे, सुनील खरात, विष्णू पवार, सुभाष ठोके, गणेश मुसळे यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...