आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुपम भाटिया करणार 75 तास पोहण्याचा विक्रम!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आंतरराष्‍ट्रीय जलतरणपटू अनुपम भाटिया 15 ऑगस्‍ट 2014 रोजी सिद्धार्थ जलतरण तलावात 75 तास पोहण्याचा जागतिक विक्रम करणार आहे. या विक्रमासाठी त्यांना गिनीज बुक व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सर्ची परवानगी मिळाली आहे. या जागतिक विक्रमानंतर लोकसहभागातून उभारली जाणारी एक कोटी रुपये रक्कम मानसिक विकलांगांसाठी दान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक विक्रमासाठी अनुपम यांना किरण शूरकांबळे, अभय देशमुख, धनंजय फडके, अभिजित वारे, संजय तुंगीकर, डॉ. जगदाळे व सिद्धार्थ जलतरण तलावाचे सर्व कर्मचारी, प्रशिक्षक व इंग्लंडचे प्रशिक्षक ज्युली ब्रॅडशॉ हे मार्गदर्शन करत आहेत. यापूर्वी त्यांनी 30 तास 15 मिनिटे पोहून राष्‍ट्रीय विक्रम केला आहे.
आता 75 तास पोहून ते जागतिक विक्रम आपल्या नावे करणार आहेत. या विश्वविक्रमासाठी त्यांना रामेश्वर सराटे, राजेश सरकटे, संजय चंद्रशेखर, स्वप्निल वडगावकर, राजीव बडवे, कांचन बडवे, समीर वायचल आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
युगोस्लाव्हियाच्या मार्टिन स्ट्रेलने चार वर्षांपूर्वी 72 तास पोहण्याचा विश्वविक्रम केला आहे. हा विक्रम अद्याप कुणीही मोडलेला नाही. औरंगाबादचा आंतरराष्‍ट्रीय जलतरणपटू अनुपम भाटिया येत्या 15 ऑगस्ट रोजी 75 तास पोहून हा विक्रम मोडण्यासाठी सज्ज झाला आहे.

दोन विश्वविक्रम
विकलांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी भाटिया 1 कोटी रुपये जमा करणार आहे. त्यासाठी तो 75 तास पोहण्याचा विक्रम करणार आहे. फेसबुकवर त्याने लोकांना विकलांगांसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे त्याच्या सामाजिक दायित्वाचा एक विक्रम आणि सलग 75 तास पोहण्याचा विश्वविक्रम स्थापित होईल.