आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • APC Dr. Sandip Bhajibhakare Rape Attempt Cancellation At Aurangaabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजीभाकरे यांच्यावरील बलात्काराचा गुन्हा रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. टी. जोशी व न्यायमूर्ती एस. बी. देशमुख यांनी रद्द केला आहे.

छावणी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. भाजीभाकरे यांच्याविरोधात एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सदरील महिला पोलिस आणि तिच्या आईच्या जबाबाच्या आधारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांनी भाजीभाकरे यांच्याविरुद्ध भादंवि. कलम 376 ब, 323, 292, 120 ब आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरोजिनी कदम यांच्या फिर्यादीवरून भाजीभाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याविरोधात भाजीभाकरे यांनी खंडपीठात याचिका दाखल करून गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती केली. याचिकेत म्हटले होते की, या महिलेने राज्य महिला आयोगाकडेही तीन सहायक पोलिस आयुक्तांविरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणाची चौकशी विशाखा समितीने केली असता मानसिक, शारीरिक किंवा लैंगिक छळ झाल्याचा पुरावा आढळला नाही. फक्त अश्लील संभाषण व संदेशाचे पुरावे मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात कलम 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील महिलेच्या तक्रारीनुसार छावणीतील त्यांच्या केबिनमध्ये बलात्कार करण्यात आला, परंतु अशा सार्वजनिक ठिकाणी तिच्या संमतीशिवाय ही घटना होणे शक्य नाही. तसेच 376 ब प्रमाणे गुन्हा घडण्याची परिस्थिती कुठेही आढळून येत नाही. म्हणून 376 ब प्रमाणे दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली. सुनावणीअंती न्यायालयाने 376 ब कलम रद्द ठरवून इतर कलमे कायम ठेवली आहेत. भाजीभाकरे यांच्यातर्फे अँड. सतीश तळेकर व अँड. उमाकांत अवटे यांनी बाजू मांडली.