आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लैंगिक शोषण प्रकरण : संदीप भाजीभाकरे निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लैंगिक शोषण आणि अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त तथा चिपळूण येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संदीप भाजीभाकरे यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश गृह खात्याने नुकतेच दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस शिपायाने भाजीभाकरे यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. यांच्याविरुद्ध सप्टेंबर 2012 मध्ये महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी विशाखा समितीमार्फत करण्यात आली होती. दरम्यान, दोन सहायक पोलिस आयुक्तांना या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली, तर भाजीभाकरे यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच त्यांची चिपळूणला बदली करण्यात आली होती. महिनाभरापूर्वी त्या महिला पोलिसाने विधानभवनासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी पोलिस महासंचालकांना पडताळणी अहवाल पाठवला होता.

हा अहवाल पोलिस महासंचालनालयाकडून गृहखात्याला पाठविण्यात आल्यानंतर त्याआधारे दोन आठवड्यापूर्वी भाजीभाकरे यांना निलंबित करण्यात आले. मात्र, याबद्दल अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या शेवटी त्यांची पदोन्नती होणार होती.