आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅपेचालकांकडून प्रवाशांची लूट; ज्येष्ठांचा केला जातो अपमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - वाळूज भागातील कामगार व प्रवाशांना अ‍ॅपेरिक्षा चालकांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय जास्तीचे भाडे आकारून प्रवाशांची लुबाडणूक केली जात आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या वाहनांअभावी प्रवाशांना नाईलाजाने अ‍ॅपेरिक्षा व इतर खासगी वाहनांतून प्रवास करणे भाग पडत आहे.

वाळूज परिसरात पंढरपूर, वळदगाव, जोगेश्वरी, वडगाव क ोल्हाटी, रांजणगाव शेणपुंजी, घाणेगाव, नारायणपूर, शिवराई, लांझी, रामराई, नायगाव, कमलापूर, इटावा, क ासोडा, करोडी, तिसगाव, पाटोदा अशी अनेक लहानमोठी गावे, एमआयडीसीतील विविध क ारखाने व बजाजनगर ही पाऊण लाखांची क ामगार वसाहत हा परिसर मिळून दोन लाखांवर लोकवस्ती आहे.

या तुलनेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस व शहर बसची संख्या नगण्य आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर बस मिळणे क ठीण होते. परिणामी, प्रवाशांना अ‍ॅपेरिक्षातून प्रवास करावा लागतो. यामुळे लहान मोठय़ा अपघाताच्या घटनांमध्ये अनेक प्रवाशांना जायबंदी व्हावे लागते, तर अनेकांना कायमचे प्राणाला मुकावे लागले आहे.

वारंवार अपघाताच्या घटना
वाळूजचा कमलापूर मार्ग, लांझी चौक, पंढरपूरचा तिरंगा चौक, महाराणा प्रताप चौक या भागात खासगी वाहनांचे थांबे आहेत. प्रवासी घेताना खासगी वाहनधारक वाहने रस्त्यावर उभी क रून प्रवासी भरतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होऊन अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. अशावेळी अ‍ॅपेरिक्षाचालक दुसर्‍या वाहनधारकाला मारहाण करतात. प्रसंगी त्याच्याकडून पैसेही उकळतात. वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यास ते पोलिसी कारवाईचा वचपा प्रवाशांची लूट क रून भरून क ाढतात.

या खासगी वाहनांचे अनेक चालक तर अल्पवयीन मुले आहेत. त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही. त्यांना वाहतूक शाखेने शिस्त लावण्याची गरज आहे.

बसेस वाढवल्यास प्रवाशांची समस्या सुटेल
बजाजनगर व वाळूज परिसरात शहर बसचे प्रमाण कमी आहे. त्या ठरावीक वेळेतच आहेत. बस येईपर्यंत प्रवासी थांबू शकत नाहती. हीच संधी खासगी वाहनचालक साधतात. बसेसची संख्या वाढवल्यास प्रवाशांची सोय होऊ शकेल. ज्ञानेश्वर देसाई, वाळूज ग्रामस्थ

पोलिसांची कारवाई सुरू
वाळूजचा लांझी चौक व कमलापूर चौकदरम्यान रहदारीला अडथळा होत होता. पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी सिमेंटचे गट्टू बसवले आहेत. वेडीवाकडी वाहने लावणार्‍यांवर दररोज कारवाई सुरू आहे. अशोक कदम, पोलिस निरीक्षक, वाळूज पोलिस ठाणे

धोकादायक प्रवास
खासगी वाहनधारक खचाखच प्रवासी तर भरतातच परंतु प्रवासी घेण्यावरून चालकांत जीवघेणी स्पर्धा होते. एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी वाहने वेगाने चालवली जात असल्याने अपघात होतात. प्रवासी घेताना चालकांमध्ये वादही होतो. प्रवासी घेण्यासाठी अ‍ॅपेरिक्षा महामार्गाच्या कडेला न लावता रस्त्यावरच उभ्या केल्या जातात.

सव्वाशेंवर वाहने
वाळूज, पंढरपूर, बजाजनगर, एमआयडीसी भागात सव्वाशेंवर खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावतात. त्यात जीप, अ‍ॅपेरिक्षा, ऑटोरिक्षा आदींचा समावेश आहे. क ामगारांना कंपनीत वेळेवर पोहोचण्यासाठी तसेच हात दाखवला तेथे त्या थांबत असल्याने प्रवासी या वाहनांत बसतात.