आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aphibias Air Service Starts For Tourism Development At Dams

धरणांच्या पर्यटनासाठी राज्यात सुरू होणार अ‍ॅम्फिबिअस विमानांची सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील विविध धरणांचा पर्यटनासाठी वापर करण्याची अनोखी योजना महाराष्‍ट्र राज्य पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे लवकरच मुंबईहून अ‍ॅम्फिबिअस विमानांची सेवा सुरू केली जाणार आहे. या योजनेसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि गोदावरी खो-यातील जलसाठ्यांचा वापर केला जाणार आहे. याशिवाय साहसी पर्यटन वाढवण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जाणार असून जागतिक पातळीवरील हॉट एअर बलून फेस्टिव्हल औरंगाबादमध्ये घेता येईल का, याची चाचपणीही एमटीडीसीने सुरू केली आहे.
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी नुकतीच ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी महामंडळाच्या नव्या योजनांबाबत माहिती दिली.
हॉट एअर बलून महोत्सव
उंचावरून पर्यटनस्थळे बघण्याची अनोखी संधी मिळावी या हेतूने लोणावळ्यात हॉट एअर बलून सेवा सुरू करण्यात आली आहे. राजस्थानात यशस्वी झालेला हा उपक्रम महाराष्‍ट्रातही राबवला जाणार आहे. त्यासाठी स्कायवॉल्टझ् या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. औरंगाबादलाही तो सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, फक्त त्याची व्यवहार्यता तपासून निर्णय घेतला जाईल. पुढील वर्षी औरंगाबादमध्ये आंतरराष्‍ट्रीय हॉट एअर बलून महोत्सव घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
काय आहे अ‍ॅम्फीबिअस विमाने ?
1918 मध्ये गे्रट ब्रिटनमध्ये पहिले अ‍ॅम्फिबिअस विमान तयार झाले. बचाव कार्य आणि लष्करी कामांसाठी त्याचा वापर व्हायचा. त्यात फेरबदल होत आताचे ‘अ‍ॅम्फिबिअस’ तयार झाले. कमी आसन क्षमतेचे हे विमान काहीशा कमी गतीने उडत असले तरी खालील बाजूस तरंगण्यासाठी फ्लोटर्स असल्याने ते पाण्यावरही सहज उतरु शकते. जमिनीवर उतरण्यासाठी चाकांचीही सोय असते. याला धावपट्टीही कमी असली तरी चालते. लहान लहान द्वीपसमुहांत विमानतळांसाठी जागाच नसल्याने ही विमाने उपयुक्त ठरतात.
यात अ‍ॅल्युमिनीअमचा वापर अधिक होत असल्याने ती वजनालाही तशी हलकी असतात.
औरंगाबादसाठी काय?
० औरंगाबादेत ऐतिहासिक मुघल गार्डन आहेत, अजिंठा, वेरूळ, दौलताबाद किल्ला, लोणार आहे, शिवाय हेरिटेज वॉकसारखा उपक्रम राबवता येणे शक्य आहे.
० शहरातील दरवाजांचे सौंदर्य वाढवणारे सुशोभीकरण व विद्युत रोषणाई करण्याचा विचार आहे. सीआयआयसोबत झालेल्या बैठकीत उद्योजकांनी दरवाजे दत्तक घ्यावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
० दरवाजांचे सुशोभीकरण झाल्यास औरंगाबादचा नाइट हेरिटेज टूर शक्य
० औरंगाबाद शहरातील पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी ओपन ०बसचा पर्याय असला तरी धुळीचा विचार करता त्यापेक्षा चांगल्या आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्या एसी बसेसची सेवा सुरू करणे शक्य.
०अजिंठा, वेरूळ आणि शहरासाठी दर तासाला अशा बसेसची सेवा देणे शक्य.
०पावसाळा सोडला तर औरंगाबादचे हवामान चांगले. त्यामुळे ही सेवा यशस्वी होईल.
* विमान प्रवास व साईदर्शन एकाच तिकिटात
* शिर्डीसाठी मुळाचा वापर
कृष्णा व गोदावरी खोरे महामंडळाशी करार करण्यात आला असून त्यांच्या जलसाठ्यांचा वापर करून पर्यटकांचा ओघ वाढवता येईल. जायकवाडीचा परिसर पक्षी अभयारण्य असल्याने तेथे ही सेवा होणे शक्य नाही. शिर्डीसाठी मुळा प्रकल्पाचा वापर केला जाईल. त्यासाठी साई संस्थानसोबत बोलणी करून विमान तिकिटातच दर्शनाची सोय अशा ऑफर्स देणे शक्य आहे. या सेवेसाठी नऊ आसनी विमानांचा वापर केला जाईल.
* साहसी पर्यटन
राज्यात साहसी पर्यटनाबाबतही योजना आखण्यात आल्या आहेत. रॉक क्लायम्बिंगचे रुट्स विकसित केले जाणार आहेत. त्यासाठी राज्यातील पर्वतरांगा आदर्श आहेत. तसेच पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, मड बायकिंग आदी साहसी प्रकारांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुढील वर्षी प्रचंड शक्तिशाली अशा व्होल्व्हो बोट रेसिंग स्पर्धेचेही आयोजन केले जाणार आहे. पॉवर बोट शर्यत हा साहसी प्रकार पर्यटनाला पोषक ठरेल.
* थेट समुद्रकिनारी लँडिंग
एमटीडीसीने एका हवाई वाहतूक कंपनीसोबत करार केला असून पाणी आणि जमिनीवर उतरू शकणा-या अ‍ॅम्फिबिअस विमानांच्या माध्यमातून पर्यटकांना कमी वेळेत पर्यटनस्थळी जाता येईल. कोकणातील पर्यटन हे सध्या सुट्यांचे पर्यटन आहे. त्याचे वीक एंड पर्यटन व्हावे यासाठी ही सेवा उपयुक्त ठरू शकते. काही मिनिटांत, तासात मुंबईहून थेट समुद्रकिनारी पर्यटक दाखल होऊ शकतात. शिवाय महाराष्‍ट्रातील इतर ठिकाणांनाही याचा फायदा होऊ शकतो.
* काय आहे अ‍ॅम्फीबिअस विमाने ?
1918 मध्ये गे्रट ब्रिटनमध्ये पहिले अ‍ॅम्फिबिअस विमान तयार झाले. बचाव कार्य आणि लष्करी कामांसाठी त्याचा वापर व्हायचा. त्यात फेरबदल होत आताचे ‘अ‍ॅम्फिबिअस’ तयार झाले. कमी आसन क्षमतेचे हे विमान काहीशा कमी गतीने उडत असले तरी खालील बाजूस तरंगण्यासाठी फ्लोटर्स असल्याने ते पाण्यावरही सहज उतरु शकते. जमिनीवर उतरण्यासाठी चाकांचीही सोय असते. याला धावपट्टीही कमी असली तरी चालते. लहान लहान द्वीपसमुहांत विमानतळांसाठी जागाच नसल्याने ही विमाने उपयुक्त ठरतात.
यात अ‍ॅल्युमिनीअमचा वापर अधिक होत असल्याने ती वजनालाही तशी हलकी असतात.