आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबा संस्थानवर IAS अधिकाऱ्याची नियुक्ती करा, SC चे राज्य शासनाला आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय मंडळावर ‘अायएएस’ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती १५ मार्च २०१७ पूर्वी करण्यात यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे. एस. केहर, न्यायमूर्ती एन. व्ही. रामन्ना, डी. वाय. चंद्रचूड व न्यायमूर्ती संजय कौल यांच्या पीठाने महाराष्ट्र सरकारला दिले अाहेत.
 
उच्च न्यायालयाच्या  आैरंगाबाद खंडपीठाचे   न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल व व्ही. एम. देशपांडे यांच्या पीठाने ०२ मे २०१४ रोजी राजेंद्र गोंदकर व संदीप कुलकर्णी यांच्या याचिकेवर शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर ‘आयएएस’ अधिकाऱ्याची नेमणूक करावी  असा आदेश दिला होता.  
 
याचिकाकर्त्याच्या वतीने  अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी साई संस्थानच्या व्यवस्थापनातील गैरव्यवहाराच्या अनेक बाबी सर्वाेच्च न्यायालयाच्या निदर्शनास अाणून दिल्या हाेत्या. दररोज वाढणारी भाविकांची गर्दी, संस्थानाचा वाढता कारभार, संस्थानातर्फे बांधण्यात येणारी भक्त निवासे, रुग्णालये, उद्याने, व इतर सुविधांचा कारभार पाहण्यासाठी कार्यक्षम व अनुभवी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे कसे गरजेचे आहे,  यासंबंधीचे सविस्तर विवेचन सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आले हाेते. 
  
दरम्यान, राज्य शासनाच्या सेवेत भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने संस्थानाच्या मुख्य कार्यकारीपदी आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करणे अशक्य असल्याचा युक्तिवाद सरकारने केला हाेता, मात्र न्यायालयाने ताे फेटाळून लावला. तसेच १५ मार्च २०१७ पूर्वी संबंधित अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्यास न्यायालयाचा अवमान होईल असेही सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले अाहे. याचिकाकर्त्यातर्फे  अॅड.प्रज्ञा तळेकर यांनी बाजू मांडली तर अॅड.अतुल डक यांनी त्यांना सहकार्य केले. अॅड.निशांत कातनेश्वरकर यांनी सरकारची बाजू मांडली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...