आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Appendix Bursting To Be Investigating; Medical Director Take Seriously

अपेंडिक्स फुटल्याची चौकशी होणार; वैद्यकीय संचालकांनी घेतली गंभीर दखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटीच्या डॉक्टरांच्या चुकीच्या रोगनिदानामुळे सातवर्षीय बशराच्या पोटातच अपेंडिक्स फुटल्याने ती अत्यवस्थ आहे. या प्रकाराची गंभीर दखल वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी घेतली असून त्यांनी संपूर्ण केसपेपर मागवले आहेत. याप्रकरणी तातडीने चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

बालिकेच्या पोटात अपेंडिक्स फुटल्याचे वृत्त गुरुवारी ‘दिव्य मराठी’त झळकताच वैद्यकीय संचालक डॉ. शिनगारे यांनी गंभीर दखल घेतली. चौकशी समितीचा अहवाल आठ दिवसांच्या आत देण्यात येईल. अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी अधिष्ठाता व चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले. दरम्यान, दोन निवासी डॉक्टरांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अन्यथा संपावर जाऊ, असा इशारा ‘मार्ड’ संघटनेने प्रशासनाला दिला होता.रात्री उशिरापर्यंत संपाचा मागमूस नव्हता. प्रशासनानेही त्यास दुजोरा दिला. निवासी डॉक्टरांवरील निलंबन मागे घेण्यात येणार नाही, हेही डॉ. खैरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. शस्त्रक्रियेनंतर बुशराची प्रकृती सुधारत आहे.

संघर्ष समिती स्थापणार
बुशरा शेखसारखी परिस्थिती कोणावरही ओढवू नये आणि डॉक्टर-रुग्णांमध्ये एक प्रकारचा दुवा निर्माण व्हावा, या व्यापक उद्देशाने विविध राजकीय संघटना एकत्रितपणे रुग्णसेवा संघर्ष समिती लवकरच घाटीमध्ये स्थापन करणार आहेत. या समितीचा फलक घाटीमध्ये लावला जाणार असून त्यावर गरजूंनी संपर्क साधण्यासाठी मोबाइल क्रमांक उपलब्ध केला जाणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी रोहित थोरात, उपाध्यक्षपदी शेख मिकाईल, सचिवपदी गुरुमितसिंग गिल, कार्याध्यक्षपदी विशाल निकाळजे, तर सदस्यपदी आझम जहागीरदार हे असणार आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर्स सेलतर्फे याप्रकरणी डॉ. प्रशांत पाटील यांचा निषेध केला असून अधिष्ठात्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

वरिष्ठ डॉक्टरांच्या दुर्लक्षाची दखल : प्रभारी अधिष्ठाता व नेत्र विभागप्रमुख डॉ. भास्कर खैरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे.यामध्ये औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. अन घा वरूडकर, शरीर विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. र्शीनिवास गडप्पा यांचा समावेश आहे. या समितीची गुरुवारी दुपारी पहिली बैठक झाली. यात सर्व केसपेपर व मेडिकल नोट्स तपासण्यात आले व केसपेपरमध्ये खाडाखोड करण्यात आल्याचेही लक्षात आले.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात वरिष्ठ डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याची नोंदही पहिल्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.